Take a fresh look at your lifestyle.

महाराजांचा इतिहास संजीवनी देणारा..; ‘पावनखिंड’ चित्रपटाला RSS’ ची पसंती

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बाजीप्रभूंनी निष्ठा दर्शविणारा ऐतिहासिक कथानकावर आधारित ‘पावनखिंड’ प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसतोय. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षक यांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. शिवजयंतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला हा चित्रपट पाहण्यासाठी तमाम शिवप्रेमी आणि मराठी रसिक गर्दी करत आहेत. या चित्रपटाच्या टीमने नुकतीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली होती. या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ पावनखिंड चित्रपटाच्या इन्स्टा पेजवर शेअर केले आहेत. दरम्यान भागवतांनी चित्रपटाला पसंती दर्शवित प्रतिक्रिया दिली आहे.

पावनखिंड या ऐतिहासिक चित्रपटाबाबत प्रतिक्रिया देताना मोहन भागवत म्हणाले कि, “छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा येणाऱ्या सर्व पिढ्यांना, आपल्याला आपल्यानंतरच्या पिढ्यांना स्वाभिमान आणि संजीवनी देणारं आहे. त्यामुळे ते सर्वांसमोर आलं पाहिजे आणि योग्य रितीने आलं पाहिजे, इतिहास म्हणून आला पाहिजे. त्याबरोबर त्याचा जो भावनात्मक आशय आहे, किंवा संस्कार आहे, तो आला पाहिजे. त्या दृष्टीने हा चित्रपट अत्यंत सरस झालाय आणि खूपच परिणामकारक आहे, असं लक्षात येतंय.”

यानंतर ‘अचानक मिळालेला आशीर्वाद असे म्हणत चित्रपटाच्या इंस्टाग्राम पेजवर भेटीचे फोटो व्हिडीओ शेअर केले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांची भेट घेण्याची संधी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि टीमला मिळाली. यावेळी त्यांना वीरांगना टीझर, मुख्य ट्रेलर, युगत मांडली गाणे आणि क्लायमॅक्समधील काही भाग दाखविण्यात आला. सुरुवातीला दिलेली २० मिनिटांची वेळ बघता बघता १ तासाची चर्चात्मक भेट कधी झाली हे कुणालाच कळलं नाही. यानंतर भागवतांनी लवकरच संपूर्ण चित्रपट पाहण्याची इच्छा दर्शविली आहे.