हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘कोण होणार करोडपती’ या मराठमोळ्या शोचे येत्या ६ जून २०२२ पासून प्रसारण होणार आहे. त्यामुळे सध्या या शोसाठी सूत्रसंचालन करणारे आणि मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते सचिन खेडेकर चांगलेच चर्चेत आहेत. आपल्या देहबोलीमुळे आणि आवाजामुळे ते प्रेक्षकांचे लाडके आहेत. दरम्यान या शोच्या प्रमोशनसाठी सचिन खेडेकर यांनी मीडियाशी संवाद साधला. दरम्यान रानबाजार या वेब सीरिजमधील बोल्ड दृश्यांसाठी प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडीतला ट्रोल केले जात आहे याविषयी बोलताना सचिन खेडेकरांनी हि बाब दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.
सचिन खेडेकरांनी याबाबत ‘लोकसत्ता’ला मुलाखत देताना रानबाजारवरील ट्रोलिंगवर स्पष्ट वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले कि, “मराठी प्रेक्षकांना हिंदीमध्ये अशा भूमिका केलेल्या चालतात, पण मराठीत असं कोणी केलं की त्यांचा आक्षेप असतो. मला असं वाटतं की हे असं बरोबर नाही. त्या दोघींनी सीरिजमध्ये खूप छान काम केलं आहे. ज्या वयात आहेत त्यांना त्यानुसार भूमिका मिळाल्या आहेत, उलट त्यांना या भूमिका करताना एक अभिनेत्री म्हणून त्यांना वाव मिळाला आहे. त्यांनी ती भूमिका चांगल्याप्रकारे निभावण्याचा प्रयत्न केला पण त्यांना ट्रोल होत असल्याचे पाहून खूप वाईट वाटलं. त्या दोघी त्या कथेचा अविभाज्य भाग आहेत. अभिनेत्री म्हणून त्यांच्या कामाच कौतुक होण्या ऐवजी त्यांना ट्रोल करण्यात आलं हे खूप दुर्देवी आहे”
https://www.instagram.com/tv/CeVMFlQK03a/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान, अभिनेता सचिन खेडेकर पुन्हा एकदा मराठी ‘कोण होणार करोडपती’ या ज्ञानाच्या खेळाचे सुत्रसंचालन करणार आहेत. शिवाय हा शो येत्या ६ जून २०२२ पासून प्रसारित होणार आहे आणि त्यामुळे लोकांमध्ये खेडेकर सध्या चर्चेत आहेत. ‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरात पहिला जाणारा शो आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येकाने करोडपती होण्याचे स्वप्न पहायला हरकत नाही. आता प्रत्येकाला हि होत सीट अनुभवण्याची संधी आहे. तुम्हीही सामील व्हा आणि करोडपती व्हा!
Discussion about this post