Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

रितेश देशमुखच्या ‘वेड’पणाला सचिन पिळगांवकर यांच्याकडून कौतुकाची थाप

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 31, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Ved
0
SHARES
508
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकताच शुक्रवारी ३० डिसेंबर २०२२ रोजी ‘वेड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख अभिनित या चित्रपटातून बऱ्याच वर्षांनी एकत्र मोठ्या पडद्यावर दिसले आहेत. या चित्रपटाबाबत गेले कित्येक दिवस प्रत्येकजण उत्सुक होता. आता हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद देत रितेश जिनिलियाच्या केमिस्ट्रीला पसंती दिली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून जिनिलियाने मराठी सिने इंडस्ट्रीत आणि रितेशने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. रितेशची दिग्दर्शन पाहून त्याचे अनेकांनी कौतुक केले आहे. यामध्ये आता सचिन पिळगांवकर यांच्याही कौतुकपर शब्दांचा समावेश झाला आहे.

View this post on Instagram

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

‘वेड’ हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आदल्या दिवशी गुरुवारी या चित्रपटाचा प्रीमियर सोहळा पार पडला. यावेळी मराठी आणि बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीतील अनेक कलाकार हजर होते. रितेश देशमुख दिग्दर्शित ‘वेड’ या चित्रपटाने अनेकांना वेड लावले. अगदी मराठी सिने विश्वातील दिग्गज अभिनेते सचिन पिळगावकर आणि त्यांची पत्नी अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांनाही.. सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर यांनी एकत्र हा चित्रपट पाहीला आणि चित्रपटावर कौतुकाचा वर्षावसुद्धा केला.

View this post on Instagram

A post shared by Sachin Pilgaonkar Official (@sachin.pilgaonkar)

माध्यमांशी बोलताना सचिन पिळगांवकर यांनी ‘वेड’ या चित्रपटाबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी रितेश देशमुखच्या अभिनयासह त्याच्या दिग्दर्शनाचेही कौतुक केले आहे. सचिन पिळगांवकर असं म्हणाले कि, ‘त्याला पहिल्यापासून काहीतरी चांगले करण्याचे वेड आहे. ते वेड या पद्धतीने तुमच्यासमोर आले आहे. त्याने पहिल्यांदा दिग्दर्शन केले आहे मात्र चित्रपट बघून असे वाटत नाही.’ सचिन पिळगांवकरच नव्हे तर निवेदिता सराफ यांनीही रितेशच्या दिग्दर्शनाचे कौतुक केले आहे. या चित्रपटात अशोक सराफ यांनी रितेशने साकारलेल्या पात्राच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात रितेश, जिनिलिया, अशोक सराफ यांच्याशिवाय विद्याधर जोशी, शुभंकर तावडे आणि जिया शंकर यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत.

Tags: Genelia D'souza DeshmukhMarathi MovieRiteish deshmukhSachin PilgaonkarVed
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group