Take a fresh look at your lifestyle.

बिकिनीवर हिंदू देवतांच्या प्रतिमा छापणारा ब्रॅण्ड वादाच्या भोवऱ्यात; सोशल मीडियावर संतापाची लाट

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सहारा रे स्विम’ नामक कपड्यांच्या ब्रॅण्डचा नेहमीच बोलबाला असतो. सिनेसृष्टीत हा ब्रॅण्ड अतिशय नामांकित ब्रॅण्ड्सपैकी एक मानला जातो. अनेक चित्रपटांमध्ये अभिनेत्रींनी परिधान केलेले स्वीमवेअर हे अशाच नामांकित ब्रॅण्ड्सचे असतात. पण गेल्या काही दिवसांपासून ‘सहारा रे स्विम’ वादाच्या भोवऱ्यात गुंतल्याचे दिसत आहे. त्याचे कारण ठरले आहे हिंदूंच्या भावना. होय. सहारा रे स्वीमच्या नव्या कलेक्शनमध्ये स्वीमवेअर वर चक्क हिंदू देवदेवतांचे फोटो छापण्यात आले आहेत. हे पाहून आपल्या भावना दुखावल्याचे आरोप करीत नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर या ब्रॅण्डला चांगलेच पिसून काढले आहे. गेल्या काही दिवसांपासून हा रोष आणि हा संताप वाढताना दिसतोय. त्यामुळे सहारा रे स्विम अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे.

सहारा रे हा ब्रँड ओन्ली फॅन्स मॉडेलसाठी नवनवीन कलेक्शन तयार करीत असतो. या ब्रँडने ‘ऑरा कलेक्शन २०२२’ या नावाने स्विमवेअरचे एक नवे कलेक्शन नुकतेच बाजारात आणले आहे. यामध्ये बहुतांशी थॉन्ग्स आणि मायक्रो स्ट्रिंग टॉप्स असे वेअर्स आहेत. तर या नवीन कलेक्शनमध्ये या स्वीमवेअर्सवर हिंदू देवतांच्या प्रतिमा आहेत आणि हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आक्षेपार्ह स्विमवेअर दाखवणाऱ्या मॉडेल्सच्या फोटोंमुळे नेटकऱ्यांचा संताप वाढला आहे.

हे फोटो शेअर करताना, एका युजरने लिहिले कि, “म्हणून, आता सौंदर्य शास्त्राच्या नावाखाली ते बिकिनी बॉटम्स आणि टॉप्सवर हिंदू देवांचा वापर करत आहेत. ही सहारा रेची स्विमवेअर कंपनी आहे. हे फक्त डिझाइनसाठी आहे की त्यामागे त्यांचा हेतू आहे? किंवा जर ते खूप धार्मिक आहेत? त्यांनी येशूपासून सुरुवात करावी, नाही का?”

याशिवाय आणखी एकाने लिहिले कि. ”पाश्चिमात्य देश हिंदू देवी- देवतांना फॅशन डिझाईन म्हणून कसा वापर करत आहेत. “ते येशूचे फोटो ठेवण्याचा प्रयत्न का करत नाहीत?”. तसेच आणखी एकाने लिहिले कि, “हिंदू धर्म हा तुमच्यासाठी विनोद वा पैसे कमावण्याचे साधन असू शकत नाही. दरम्यान ‘सहारा रे’ने सोशल मीडियावरील संतापाची उसळणारी लाट पाहता लोकांच्या प्रतिक्रिया टाळण्याच्या त्यांच्या कपड्यांचे ब्रॅण्डिंग करणारे सोशल मीडियावरील अधिकृत इंस्टाग्राम हँडल ‘खाजगी (Private)’ केले आहे.