Take a fresh look at your lifestyle.

बादशाह – सहदेवचं ‘बचपन का प्यार’ प्रदर्शित होताच झालं हिट; 1.8 मिलिअन व्ह्यूज पार

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बचपण का प्यार या गाण्याची काही भलतीच झिंग चढली आहे. हे गाणे तसे कुणाला माहित नव्हते पण एका लहान मुलाने ते गायलं काय आणि सोशल मीडियावर ट्रेंड झालं काय… हे गाणं गाणारा तो लहान मुलगा अर्थात सहदेव नुसता ट्रेंड नाही झाला तर त्याने अलग प्रसिद्धीची परिसीमा गाठली. बॉलिवूड रॅपर बादशाहला त्याच्या गाण्याची अशी झिंग चढली कि त्याने थेट एक रॅप सोंग प्रदर्शित केले आहे. इतकेच नव्हे तर, या गाण्यात सहदेव दिर्दोदेखील अनोख्या अंदाजात दिसतोय. हे गाणं नुकतंच युट्यूबवर प्रदर्शित झालं असून चांगलंच हिट झालं आहे.

‘बचपन का प्यार’ गाण्याची नेटकऱ्यांमध्ये इतकी लोकप्रियता निर्माण झाली आहे कि प्रदर्शन होताच या व्हिडीओने लाखों व्हिव्यू पार केले होते. बादशाह आणि सहदेव यांच्या ‘बचपन का प्यार’ गाण्यात गायिका आस्था गिल आणि रिको देखील आहेत. सहदेवचं ‘बचपन का प्यार’ इतकं लोकप्रिय झालं होतं की सोशल मीडियावर जिथे तिथे तो व्हिडीओ शेअर होत होता. शिवाय अनेक नेटकरी आणि अनेक कलाकार या गाण्यावर रील्स बनवून शेअर करताना दिसले. सोशल मीडियावर हे गाणं ऐकून बादशाहने सहदेवसोबत गाणं बनवायचं ठरवलं आणि त्यानंतर सहदेवला मुंबईला भेटायला बोलावलं. यानंतर चक्क बादशाहने सहदेवसोबत गाणं प्रदर्शित केलं आहे.

या व्हिडिओत सहदेव बादशाहसोबत नृत्य करताना दिसत आहे. तर गाण्यात बालपणापासून तरुणपणापर्यंतची एक गोड प्रेमकहाणी दाखवण्यात आली आहे. हे गाणं बादशाहने त्याच्या ऑफिशिअल युट्यूब चॅनेलवर प्रदर्शित केलं असून या गाण्याने सध्या चांगलाच धुमाकूळ घातला आहे. सध्या या गाण्याने १.८ मिलियन व्ह्यूज पार केले आहेत.
यासोबतच बादशहाने इंस्टाग्रामवर सहदेवचा एक व्हिडीओ पोस्ट करत लिहिलं, ‘सहदेव जेव्हा तू मला भेटायला तुझ्या गावाहून मुंबईला आलास तेव्हा माझ्यासाठी एक भेट घेऊन आलास. सहदेवने दिलेली भेट माझ्या किमती भेटवस्तूंपैकी एक आहे. मी सहदेवच्या उज्ज्वल भविष्याची आशा करतो. मला विश्वास आहे की हे ‘बचपन का प्यार’ जग कधीही विसरू शकणार नाही.’