Take a fresh look at your lifestyle.

सैफ अली खानच्या ‘जवानी जानेमन’चे नवे पोस्टर रिलीज…

0

चंदेरी दुनिया । सैफ अली खानचा आगामी सिनेमा जवानी जानमेनचे नवे पोस्टर रिलीज झाले आहे. मेकर्सनी सोमवारी पहिले पोस्टर रिलीज करत सिनेमाची रिलीज डेट अनाऊंस केली होती. मात्र यात सैफ अली खानचा चेहरा दाखवला नव्हता. मात्र दुसऱ्या पोस्टरमध्ये सैफ अली खान हसताना दिसतोय.

जवानी जानमेन सिनेमाची निर्मिती जॅकी भगनानी करतो आहे. पोस्टर बघून सैफ अली खान यात प्लेबॉयची भूमिका साकारणार असल्याचा अंदाज लवण्यात येतो आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन नितिन कक्कड करतोय. यात सैफ 40 वर्षांच्या व्यक्तिची भूमिका साकारणार आहे. या सैफ सोबत तब्बू, पूदा बेदीची मुलगी आलिया दिसणार आहे. आलिया या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. ‘जवानी जानेमन’ या सिनेमात आलिया सैफच्या ऑनस्क्रीन मुलीची भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘जवानी जानेमन’चे शूटिंग सुरू होण्याअगोदर आलिया सैफ आणि सिनेमातील इतर कलाकारांसोबत वेळ घालवत आहे.

डेब्यू सिनेमामध्ये प्रसिद्ध कलाकारांसोबत काम करायचे म्हटल्यावर आलिया मनातून थोडी घाबरली होती. त्यामुळे दिग्दर्शकांनी तिला शूटिंग सुरू होण्याआधी काही काळ सिनेमातील कलाकारांसोबत वेळ घालवण्याचा सल्ला दिला होता. या सल्ल्यानंतर आलिया सध्या सैफसोबत वेळ घालवते आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: