Take a fresh look at your lifestyle.

रिंकूचा ‘मखना..’ गाण्यावरील डान्स पाहिला का? नाही?; मग पहा हा व्हिडीओ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नागराज मंजुळे यांच्या सैराट चित्रपटातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरूने अगदी थोड्याच काळात लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहता यावे म्हणून ती सोशल मीडियावर सातत्याने ऍक्टिव्ह असते. तसेच ती फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच रिंकू राजगुरूने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओत “मखना” या गाण्यावर ती थिरकताना दिसतेय. सध्या तिच्या या व्हिडीओने चाहत्यांचे लक्ष चांगलेच वेधून घेतले आहे.

अभिनेत्री रिंकू राजगुरूने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, आता जिथे असाल तिथे फक्त एन्जॉय करा. रिंकू राजगुरूने शूटिंगदरम्यान मोकळा वेळ मिळाला असता हा डान्सचा व्हिडिओ शूट केला आहे. रिंकू सध्या आगामी प्रोजेक्टच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सार्थक दासगुप्ता यांनी दिग्दर्शित केलेल्या या प्रोजेक्टमध्ये रिंकूसोबत ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर देखील दिसणार आहेत. तिच्या या प्रोजेक्टच्या शीर्षक आणि कथानकाबद्दल अद्याप काहीही समोर आलेले नाही. मात्र शूटिंगच्या सेटवरून हा कोर्ट रुम ड्रामा असेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

रिंकूबद्दल आणखी सांगायच झालंच, तर नुकताच तिचा अमेझॉन प्राइमवर अनपॉज्ड हा चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटात पाच लघुपट असून त्यातील रॅट-ए-टॅटमध्ये रिंकू दिसली होती. या व्यतिरिक्त रिंकू राजगुरूने नुकतेच लंडनमध्ये आगामी मराठी चित्रपट छूमंतरचे शूटिंग पूर्ण केले आहे. छूमंतर चित्रपटात प्रार्थना बेहरेसोबत अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत. तसेच ती झुंड या हिंदी चित्रपटात दिसणार आहे. यात तिच्यासोबत अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.