Take a fresh look at your lifestyle.

जिया खानला त्याने अंतरवस्त्रे काढायला सांगितली; बहीण करिष्माचा साजिद खानवर खळबळजनक आरोप

0

हॅलो बाॅलिवुड आॅनलाईन | सरावाच्या वेळी निर्देशक साजिद खानने अभिनेत्री जिया खानला कपडे काढून सराव करण्यास सांगितले होते. यानंतर जिया घरी येऊन खूप रडली आणि त्यानंतर साजिद खानच्या प्रोजेक्टमधून तिने माघार घेतली. प्रोजेक्ट करारावर तिने सही केली नाही. असे आरोप जिया खानची बहिण करिष्मा खानने डॉक्युमेंट्रीच्या माध्यमातून केले आहेत.

अभिनेत्री जिया खानच्या आयुष्यावर ‘डेट ऑफ बॉलिवूड’ ही डॉक्युमेंटरी ‘युनायटेड किंग्डम’मध्ये प्रदर्शित झाली आहे. यामध्ये जिया खानच्या आयुष्यात घडलेले प्रसंग सांगितले गेले आहेत. मिटू मुवमेंट अंतर्गत वादात सापडलेला निर्देशक साजिद खानने कशाप्रकारे जिच्यासोबत गैरवर्तन केले हे करिष्मा खानने सांगितले आहे.

2013 मध्ये जिया खान या अभिनेत्रीने नैराश्यातून आत्महत्या केली होती. त्यावेळी बरीच मोठी चर्चा झाली होती. त्यानंतर साजिद खानवरही मिटू मोमेंटच्या अंतर्गत खूप अभिनेत्रींनी आरोप केले होते. त्यामुळे साजिद खानला हाउसफुल टू या चित्रपटांमधून बाहेर पडावे लागले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave A Reply

Your email address will not be published.