भाईजानने खरेदी केली 1.5 कोटींची बुलेटप्रुफ लँड क्रुझर कार; पहा फोटो
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूडचा भाईजान अर्थात दबंग अभिनेता सलमान खानचे चाहते फार मोठ्या संख्येत आहेत हे आपण सारेच जाणतो. त्यामुळे सलमानच्या आयुष्यातील प्रत्येक लहान सहन गोष्टीबाबत जो तो उत्सुक असतो. गेल्या काही दिवसांपासून सलमान खानच्या जीवाला धोका असल्याचे वारंवार समोर आले आहे. पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्याकांडाचा सूत्रधार बिश्नोई यांच्या गंगकडून वारंवार सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. त्यामुळे सलमानच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. अलीकडेच त्याला शस्त्र परवाना मिळाला आहे. यानंतर आता त्याने बुलेटप्रूफ कार देखील घेतल्याचे समोर येत आहे.
सलमान खान याच्या वडिलांना अर्थात सलीम खान याना मॉर्निंग वोल्क ला गेलेले असताना एक जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र मिळाले होते. यानंतर सलमान आणि त्याच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेत वाढ करण्यात आली. यानंतर सलमानने स्वतः देखील स्वतःच्या जीवाची चांगलीच काळजी घेतल्याचे दिसून आले आहे. अलीकडेच स्व संरक्षणासाठी बंदुकीचा परवाना त्याने घेतला आणि आता एक नवीकोरी लँड क्रुझर बुलेटप्रुफ कार त्याने खरेदी केली आहे. माहितीनुसार सलमानने टोयोटा लँड क्रूझर एसयूव्ही आर्मर आणि बुलेटप्रूफ ग्लाससह अपग्रेड केली आहे आणि या कारची किंमत १.५ कोटी इतकी आहे.
सोमवारी या नव्या बुलेटप्रुफ लँड क्रुझर मधून सलमान आपल्या टीमसोबत मुंबई विमानतळावर दिसला होता. त्याच्याशेजारी त्याचा बॉडीगार्ड शेरादेखील दिसत होता. कार वेबसाईट ‘कार वाले’ नुसार या टोयोटा लँड क्रुझरची किंमत दीड कोटी रुपये आहे आणि हि बुलेट प्रुफ रिलायबिलीटी सह अपग्रेड करून येते. गेल्या महिन्यात सलमानने जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर मुंबईचे पोलीस कमिशनर विवेक फणसळकर यांची भेट घेऊन आत्मसंरक्षणासाठी शस्त्र परवाना मिळावा म्हणून अर्ज केला होता. काही दिवसांपूर्वीच हा परवाना मंजूर केला असून आता सलमान त्याच्या स्व संरक्षणासाठी अधिकृतपणे सोबत शस्त्र बाळगताना दिसत आहे.