Take a fresh look at your lifestyle.

काँग्रेस नेत्याच्या मुलाच्या लग्नात ‘जुम्मे की रात’वर थिरकला सलमान खान; पहा व्हिडिओ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल यांचा मुलगा प्रजय याच्या लग्नानिमित्त जयपूरमध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उद्योगपती अनिल अंबानी, गौतम अदानी यांच्यासह इतर उद्योगपती, सलमान खान, शिल्पा शेट्टीसह चित्रपट क्षेत्रातील अभिनेते आणि राजकीय नेते उपस्थित होते. सर्व पक्षीय राजकीय नेत्यांची उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळाली.

 

 

मुलाच्या लग्नामिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रुफल पटेल हे सलमान खान, शिल्पा शेट्टी यांच्यासोबत डान्स करताना दिसून आले. प्रजय पटेल याच लग्न मुंबईतील ज्वेलरी व्यावसायिक शिरीष पुंगिलिया यांची मुलगी शिविका हिच्याशी झालं आहे. शिरीष हे मूळचे जयपूरचे असल्यानं त्यांनी लग्नाचे कार्यक्रम जयपूरमध्ये आयोजित केले होते.

 

प्रफुल पटेल यांच्या मुलाच्या लग्नानिमित्त करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी उद्योगपती सज्जन जिंदल, गौतम अदानी, अनिल अंबानी आणि त्यांची पत्नी टीना अंबानी, सुनील भारती, श्रीचंद हिंदुजा देखील उपस्थित होते. वेदांत रिसोर्सेस लिमिटेडचे अनिल अग्रवाल, क्रिकेटर रवी शास्त्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ, महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे या कार्यक्रमाला उपस्थित होते.