Take a fresh look at your lifestyle.

काय सांगताय काय? शाहरुख सोबतच्या मैत्रीसाठी सलमान खानने मानधन घेतले नाही; अधिक जाणून घ्या

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड किंग खान आणि दबंग खान यांच्या जबरदस्त केमिस्ट्रीबद्दल कोणाला माहित नाही. कित्येकदा या दोघांचे केमेकांशी अजिबात पटत नसल्याचे किस्से कानावर येत असतात. असं असलं, तरीही हे दोन्ही स्टार अभिनेते नेहमीच एकमेकांचा आणि एकमेकांच्या कामाचा खूप आदर करतात. नुकतेच बॉलीवूडच्या दबंग खानने असे काही केले आहे की त्यांच्या मैत्रीच्या कुचेष्टा करणाऱ्यांच्या तोंडाला टाळेच लागले असेल. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार या दोघांची मैत्री इतकी घट्ट आहे की शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटात काम करण्यासाठी सलमान खानने कोणतेच मानधन घेतले नाही. विश्वास बसत नाहीये ना? पण हेच सत्य आहे.

‘पठाण’ या आगामी चित्रपटामुळे सध्या शाहरुख खान अतिशय चर्चेत आहे. ‘झिरो’ चित्रपटाच्या अपयशानंतर शाहरुखचा हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटानंतर तब्बल तीन वर्षानंतर किंग खान पुन्हा एकदा चाहत्यांसाठी रुपेरी पडद्यावर येतोय. शाहरुख खान सोबत आता सलमान खान या दोघांमुळे ‘पठाण’ चित्रपटाविषयीच्या चर्चांमध्ये रंगत आली आहे. या दोघांनाही एकत्र पहाण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत. या चित्रपटात सलमान खान कॅमिओ करत आहे. सलमानने फेब्रुवारीत त्याचे शूटिंग पूर्ण केले आहे.

यापूर्वी अशी चर्चा होती की सलमान खानने या चित्रपटासाठी मोठ्या किमतीचे मानधन घेतले आहे. पण बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार सलमान खानने या चित्रपटात पैसे न घेता काम केले असल्याची माहिती मिळत आहे. शूटिंग संपल्यानंतर आदित्य चोप्रा यांनी सलमान खानशी त्याच्या मानधनाबाबत विचारणा केली असता, सलमानने सपशील नकार दिला. तो म्हणाला- ‘शाहरुख माझ्या भावासारखा आहे. मी त्याच्यासाठी काहीही करू शकतो. ‘पठाण’ या चित्रपटात शाहरुखसोबत दीपिका मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शाहरुख या चित्रपटात एजंटच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच दीपिका देखील एका एजंटच्या भूमिकेत असणार असून ती शाहरुख खानसोबत मिशनवर काम करतेय, असे या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.