Take a fresh look at your lifestyle.

सलमान खानने २० हजार कामगारांच्या खात्यात पाठवले प्रत्येकी ३ हजार रुपये

मुंबई । बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानने कोरोनाचा प्राणघातक संसर्ग रोखण्यासाठी राबविण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या चित्रपट उद्योगातील दैनंदिन वेतन मजुरांना मदत म्हणून ६ कोटी रुपये दिले आहेत.सध्या चालू असलेल्या लॉकडाऊनमुळे चित्रपटांचे शूटिंग बंद झाले आहे, ज्यामुळे दैनंदिन मजूरांना काम मिळणार नाहीत. या अडचणींमध्ये या मजुरांना मदत करण्यासाठी बर्‍याच स्टार्सनी मदत केली आहे.

View this post on Instagram

Be Home n Be Safe @nirvankhan15

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

दैनंदिन मजुरी करणार्‍या मजुरांनाही सलमानने मदत केली आहे. या मदतीसाठी सलमान खानने पहिला हप्ता दिला आहे. सलमान खानने प्राथमिक उपचार म्हणून सुमारे २० हजार कामगारांच्या खात्यात पैसे हस्तांतरित केले आहेत. असे सांगितले जात आहे की सलमानने प्रत्येक कामगारांच्या खात्यात ३००० रुपये दिले आहेत. अशाप्रकारे सलमानने डेली वर्कर्सना सहा कोटी रुपये दिले आहेत. पुढील महिन्यातदेखील सलमान खान दैनंदिन वेतन कामगारांच्या खात्यात अशाच प्रकारे पैसे जमा करणार आहे.