Take a fresh look at your lifestyle.

सलमान खान चाहत्यांना देणार मोठं गिफ्ट ; दमदार अंदाजात प्रदर्शित होणार ‘हा ‘ब्लॉकबस्टर चित्रपट

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ पुढच्या वर्षी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 2021 च्या ईदच्या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित करण्याची निर्मात्यांची योजना केली आहे. अलीकडेच काही बातम्या आल्या होत्या की हा चित्रपट केवळ ओटीटी प्लॅटफॉर्मवरच प्रदर्शित होऊ शकतो.

अनेक अंदाजाना ब्रेक लावत अखेर फिल्म ट्रेड तज्ज्ञ तरण आदर्श यांनी शुक्रवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट करून म्हटले आहे की, राधे हा चित्रपट ओटीटी वर प्रदर्शित करण्याचा अंदाज किंवा अफवा ही खोटी आहे. असा अंदाज वर्तविला जात होता की सलमान खान अभिनीत राधे सिनेमागृहात नव्हे तर थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल. हे खोटे आहे. राधे चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असल्याचे निर्मात्यांनी स्पष्ट केले आहे. 2021 च्या ईदकडे आता सर्वांचे लक्ष आहे.

यावर्षी लॉकडाउन होण्यापूर्वी सलमान खान हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी सज्ज झाला होता. प्रभू देवा दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेत्री दिशा पटानी देखील आहेत. या चित्रपटाशिवाय सलमान हा ‘किक 2’ आणि ‘कभी ईद कभी दिवाळी’ चा देखील एक भाग आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Comments are closed.