Take a fresh look at your lifestyle.

सलमानचा Tiger-3 ठरणार सर्वात महागडा सिनेमा ; चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | एक था टायगर आणि टायगर जिंदा है च्या भरगोस यशानंतर बॉलीवूडचा भाईजान सलमान खान आणि अभिनेत्री कतरीना कैफ यांच्या  टायगर सिरीजमधील ‘टायगर-3’ हा सिनेमा बिग बजेटमध्ये बनणार आहे. बॉलीवूड मधील सर्वात जास्त बजेटचा हा चित्रपट असणार आहे. सलमान खानचे जगभरामध्ये खूप फॅन आहेत. त्याच्या चित्रपटाची अनेकजण वाट पाहत असतात. त्याचप्रमाणे टायगर सिरीज त्याच्या चाहत्यांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे. सलमान खान आणि कतरीना यांचा  ‘ एक था टायगर ‘ आणि ‘ टायगर जिंदा है ‘ या सिनेमाच्या लोकप्रियतेनंतर आता याच्या तिसऱ्या  भागाची लोक खुप आतुरतेने बघत आहेत. या तिसऱ्या भागामध्ये सुद्धा सलमान आणि कतरीना दिसतील अशी अपेक्षा त्याच्या फॅन्सना आहे. पण याबाबत अद्याप कोणत्याच प्रकारची घोषणा यशराज फिल्म कडून करण्यात आलेली नाही. मात्र स्पॉटबॉयने दिलेल्या माहितीनुसार हा चित्रपट बॉलिवूडमधील आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट असणार आहे.

टायगर- 3 च्या  निर्मितीवर 200 ते 250 करोड रुपयाचा खर्च केला जाणार आहे. बॉलीवूड इतिहासातील आत्तापर्यंत सगळ्यात मोठी किंमत यासाठी वापरली जाणार आहे. चित्रपटाच्या  प्रिंट आणि पब्लिसिटीवर 20 ते 25 रुपये खर्च केले जाणार आहेत. तसेच सूत्रांच्या माहितीनुसार या सिनेमासाठी सलमान खान 100 करोड इतके मानधन घेणार आहे. त्याचबरोबर सिनेमातून मिळणाऱ्या नफ्यामध्ये देखील त्याचा वाटा असणार आहे.  ही ऍक्शन फिल्म बनवताना आदित्य चोप्रा कोणत्याही प्रकारची कसर सोडणार नाही. एकंदरित सर्व खर्च पाहता या फिल्मसाठी 350 कोटी खर्च होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे हा सिनेमा सर्वात महागडा सिनेमा ठरणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’