Take a fresh look at your lifestyle.

पत्रकाराला धमकावल्याप्रकरणी बॉलिवूडचा भाईजान कायदेशीर अडचणीत; काय आहे प्रकरण?

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीतील भाईजान अर्थात बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या कायदेशीर अडचणी काही संपेनात. एक झालं कि दुसरं समोर येऊन उभच असत. यानंतर आता त्याच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी काळविट प्रकरणात सलमानला न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला होता. मात्र यानंतर आता अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने सलमानला पुन्हा २२ मार्च २०२२ रोजी समन्स बजावले आहे. जवळपास ३ वर्ष जुन्या सायकल वादाप्रकरणी सलमानला हे समन्स पाठवण्यात आले होते. आज या प्रकरणी सलमान आणि त्याच्या बॉडिगार्डला न्यायालयात हजर राहण्यासाठी सांगण्यात आलं होत. मात्र यातून न्यायालयाने सलमानला न्यायालयात हजर राहण्याबाबत सूट दिली आहे.

अभिनेता सलमान खान याला अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयाकडून समन्स बजावण्यात आले आहे. याचे कारण म्हणजे, एका पत्रकाराला धमकावल्याचा सलमान आणि त्याच्या बॉडीगार्डवर आरोप आहे. या प्रकरणात केवळ सलमान नव्हे तर त्याच्यासोबत त्याचा बॉडीगार्ड नवाज इक्बाल शेख याचेही नाव घेतले गेल्यामुळे तोही कायदेशीर अडचणीत आहे. दरम्यान आज या दोघांनाही न्यायालयात हजर राहण्याचं समन्स बजावण्यात आलं होत. मात्र आजपुरता त्यांना न्यायालयाने सूट दिली आहे.

त्याच झालं असं कि, सलमान संबंधित हे संपूर्ण प्रकरण साधारणपणे ३ वर्षे जुने आहे. त्यावेळी एका पत्रकाराने सलमान खान मुंबईच्या रस्त्यावर सायकल चालवत असतानाचा व्हिडीओ बनवण्याचा प्रयत्न केला होता. सलमानच्या बॉडीगार्डची परवानगी घेत पत्रकाराने व्हिडीओ बनवण्यास सुरूवात केली. पण तरीसुद्धा सलमान आणि त्याच्या बॉडीगार्डने त्या पत्रकारासोबत असभ्य वर्तन केले असा आरोप संबंधित पत्रकाराने केला आहे. इतकेच नव्हे तर, आपला मोबाईल हिसकावून आपल्याला शिवीगाळ केल्याचेदेखील पत्रकाराने सांगितले. त्यानंतर पत्रकाराने अंधेरीतील डीएन नगर पोलिस ठाण्यात सलमान खानविरोधात तक्रार दाखल केली होती. संबंधित याचिका- कर्त्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २४ एप्रिल २०१९ रोजी घडली होती असे सांगण्यात आले आहे.