Take a fresh look at your lifestyle.

अभिनेता सलमान खानच्या मॅनेजरला कोरोनाची लागण

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | काही दिवसांपूर्वी बॉलीवूडचा भाईजान अभिनेता सलमान खानच्या ड्रायव्हर आणि दोन स्टार मेंबरला करोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता सलमानच्या मॅनेजर जॉर्डी पटेल यालाही करोनाची लागण झाली आहे. ‘इंडिया टिव्ही’च्या वृत्तात याविषयी नमूद करण्यात आलं आहे.

बातमीनुसार, संक्रमित सदस्यांविषयी माहिती मिळताच सलमान सध्या स्वत: ला अलग ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. आपला वैयक्तिक ड्रायव्हर आणि इतर दोन सदस्यांची योग्य काळजी घेतल्याचीही त्याने खात्री केली. त्यांना मुंबईतील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

जॉर्डीला करोनाची लागण होण्यापूर्वी सलमानच्या दोन स्टार मेंबर व कारचालकाला करोनाची लागण झाली होती. त्यावेळी सलमान आणि त्याच्या कुटुंबीयांनी करोना चाचणी केली होती. यात सगळ्यांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले होते. यावेळी सलमान सेल्फ क्वारंटाइन असल्याचं सांगण्यात येत होतं. जॉर्डी हा सलमानचा मॅनेजर असण्यासोबतच तो सेलिब्रिटी मॅनेजर, निर्माता , गायकदेखील आहे.

Comments are closed.