Take a fresh look at your lifestyle.

सलमान खानचा ‘बिग बॉस’ला अलविदा ?

0

टीम, हॅलो बॉलीवूड । सुपरस्टार सलमान खानने ‘बिग बॉस’ या रिऍलिटी शो ला सर्वोच्च टीआरपी मिळवून दिला. कायमचे होणारे वाद विवाद, त्यामुळे येणारा तणाव याचं कारण असल्याचे समजते. सलमानचे सूत्रसंचालन या शोचे विशेष आकर्षण केंद्र म्हणून ओळखले जाते. सलमान गेल्या काही काळापासून ‘ट्रिजेमिनल न्यूरेल्जिया’ या आजाराने त्रस्त आहे. त्यामुळे त्यानं जास्त ताण घेणं त्याच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं.

मागच्या काही आठवड्यांपासून सलमान बिग बॉसमध्ये रागावलेला व तणावाखाली दिसत होता. एका एपिसोडमध्ये तर रागात त्याने स्वत:चं जॅकेटसुद्धा फेकून दिलं होतं. यामुळे सलमानचे कुटुंबीय त्याच्या तब्येतीसाठी चिंतेत आहेत. परंतु सलमान आता ‘बिग बॉस’मधून निवृत्ती घेत असल्याच्या चर्चा सुरु आहेत. या चर्चांवर आता स्वत: सलमानने प्रतिक्रिया दिली आहे.

“होय, मी ‘बिग बॉस’ सोडण्याचा विचार करतोय. गेली १३ वर्ष मी या शोचे सूत्रसंचालन करत आहे. त्यामुळे एकाएकी ‘बिग बॉस’मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेणे माझ्यासाठी सोपा नाही. या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांनी मला भरभरुन प्रेम दिले. परंतु कुठेतरी थांबावेच लागते. त्यामुळे आता मी या शोमधून निवृत्ती घेण्याचा विचार करतोय.” असे झाल्यास शोच्या लोकप्रियतेत आणि एकूणच भवितव्यावर खूप मोठा फरक पडण्याची शक्यता आहे

Leave A Reply

Your email address will not be published.