Take a fresh look at your lifestyle.

तब्बल सहा महिन्यांनंतर सलमान खान शुटिंगच्या सेटवर ; फोटो शेअर करून म्हणाला की….

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलीवूडचा भाईजान अभिनेता सलमान खान आता चित्रपटाच्या शूटिंगसाठी सेटवर पोहोचला आहे. आगामी ‘राधे’ या चित्रपटाची शूटिंग सुरू झाली असून सलमान यामध्ये मुख्य भूमिकेत आहे. कोरोनामुळे देशभर सुरू केलेल्या लॉक डाउन नंतर तब्बल साडेसहा महिन्यांनंतर त्याने शूटिंगला सुरुवात केली आहे. सेटवरचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत सलमानने शूटिंगचा अनुभव सांगितला.

View this post on Instagram

Back to shoot after 6 1/2 months … feels good #Radhe

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

साडेसहा महिन्यांनंतर शूटिंगला सुरुवात केली आहे. बरं वाटतंय’, असं म्हणत सलमानने सेटवरचा फोटो पोस्ट केला. ‘राधे’ या चित्रपटात सलमानसोबतच दिशा पटानी, जॅकी श्रॉफ, रणदीप हुडा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ‘राधे’ ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार होता. पण करोनाच्या परिस्थितीमुळे चित्रपटाची शूटिंग अपूर्ण राहिली. आता अनलॉकदरम्यान सरकारच्या सर्व नियमांचं पालन करत शूटिंगला सुरुवात झाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’