Take a fresh look at your lifestyle.

सुरुवातीला चांगलं वाटत, पण नंतर…..सलमानने तुटलेल्या नात्यावर केलं भाष्य

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | सलमान खानला बॉलिवूडच्या कट्टर चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळालं आहे. फक्त भारतातच नाही तर जगभरात त्याचे चाहते आहेत. सलमान त्याच्या सिनेमांसाठी जेवढा ओळखला जातो त्याहून जास्त तो त्याच्या मैत्रीसाठी ओळखला जातो. अलीकडेच त्याने स्पष्ट केलं की त्याला मैत्री करायला वेळ लागतो आणि त्याचे जे मित्र आहेत त्यांची आणि सलमानची मैत्री २०- ३० वर्ष जुनी आहे.

तो म्हणाला, ‘सुरवातीला जीवनात येणारा प्रत्येक व्यक्ती चांगला वाटतो. वेळ जातो तसा एकमेकांच्या उणीवा दिसू लागतात. जर तुम्हाला त्या व्यक्तीच्या सर्व उणीवा मान्य असतील तर काही हरकत नाही. पण जर त्या उणीवा स्वीकारण्याची शक्ती आपल्यात नसेल तर अशी मैत्री फार काळ टिकणं अशक्य असल्याचं तो म्हणाला. 

त्याचवेळी, जर समोरच्यांचा उणीवा स्वीकारल्या नाहीत तर काहींसोबत तेवढी घट्ट मैत्री होत नाही. कालांतराने त्या नात्याची गरजही संपून जाते. सलमान पुढे म्हणाला, हळूहळू लोक त्यांच्या मार्गावर निघून. सुरुवातीला हा विचार खूप त्रास देतो. पण जेव्हा ते तुमच्या नजरेपासून दूर होतात तेव्हा ते कालांतराने मनातूनही दूर जायला लागतात. असेही सलमान खान म्हणाला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Comments are closed.