Take a fresh look at your lifestyle.

सलमान खानने उचलले काळजीवाहू पाऊल; लॉकडाऊनमध्ये गरिब आणि पोलिस प्रशासनासाठी स्वतः दखल घेऊन केली जेवणाची सोय

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा अभिनेता सलमान खानने कोरोनाच्या काळात दिवसरात्र काम करणाऱ्या पोलीस आणि फ्रंटलाइन वर्कर्सच्या मोफत जेवणाची सोय केली आहे. आपण सारेच जाणतो लॉक डाऊनमुळे पोलीस प्रशासनाचा ताण वाढला आहे. तर काही गरीब लोकांचे अन्न पाण्याशिवाय हाल होत आहेत. त्यामुळे सलमानने हे काळजीवाहू पॉल उचलले आहे. सध्या सलमान खानचे फूड ट्रक जेवण घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. या जबाबदारीचे सलमान स्वतः देखील वहन करतोय. त्याची टीम पूर्ण काळजीने पार्सल तयार करण्याचे काम करीत आहे. मात्र तरीही परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता सलमान स्वतः जातीने सर्व गोष्टींकडे लक्ष देत आहे. दरम्यान आता सलमानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

या व्हिडीओत सलमान खान मरून रंगाच्या शर्टमध्ये दिसत आहे. इतकेच नव्हे तर या व्हिडीओत तो स्वतः जेवणाची चव घेऊन पाहतो आहे. यासोबतच फूड पॅकिंग कसे केले जात आहे, याची देखील तो स्वतः तपासणी करीत आहे. सलमानने नियमांचे पालन करीत फूड टेस्ट केल्यानंतर मास्क घातला. सोबतच त्याच्या या कामात रुजू असलेली संपूर्ण टीमदेखील नियमांचे पालन करताना दिसत आहे. सलमान खानचे ‘बिग हंगरी’ नावाचे फूड ट्रक रस्त्यावर फूड पार्सल घेऊन उतरले आहे. याच्या माध्यमातून ते हजारो लोकांना जेवण पोहचविण्याचे काम करीत आहे. या ट्रकमधून फक्त कोरोना वॉरिअर्सच नाही तर गरीब आणि गरजू लोकांसाठी देखील अन्न दिले जात आहे.

सलमान खानच्या या लोकसेवा अभियानात युवा सेने नेता राहुल कनाल देखील सहभागी झाले आहेत. त्यांनी ट्विट केले आहे की, एक मोठी टीम. तिथे पोहचण्यासाठी सलमान खानचे आभार कसे मानू. तो जेवणाची व्यवस्था पाहण्यासाठी अचानक येतो, तर याहून आणखीन काय पाहिजे. कोरोना योद्धांच्या जेवणासाठी ५००० पाकिटं पाठवली. सलमान खानचा बहुचर्चित चित्रपट ‘राधे- युअर मोस्ट वॉण्टेड भाई’चा नुकताच ट्रेलर रिलीज झाला. यातील सीटी मार हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. या चित्रपटात सलमानसोबत दिशा पटानी, रणदीप हुडा आणि जॅकी श्रॉफ मुख्य भूमिकेत आहे. राधेशिवाय सलमान खान कभी ईद कभी दिवाली, किक ३ आणि अंतिम या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.