Take a fresh look at your lifestyle.

सलमानचा आगामी चित्रपट “राधे युअर मोस्ट वॉन्टेड भाई” ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलिवूडचा भाईजान सुपरस्टार सलमान खानचे चाहते त्याच्या राधेः युअरमोस्ट वॉन्टेड भाई या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. अलीकडेच सलमान आणि दिशा पाटनी यांनी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार यंदा हा चित्रपट प्रदर्शित होणे शक्य नाही. अशा परिस्थितीत निर्माते पुढच्या वर्षी राधे हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा विचार करीत आहेत. 2021 च्या ईदला हा चित्रपट रिलीज होऊ शकतो, असेही सांगितले जात आहे.

मिड डेने दिलेल्या वृत्तानुसार, या आठवड्यात सोमवारी सलमान खानची सह-निर्माता अतुल अग्निहोत्री, सोहेल खान आणि निखिल नॉमिनी यांच्याशी बैठक झाली. यापूर्वी निर्मात्यांनी प्रजासत्ताक दिनी हा चित्रपट प्रदर्शित करण्याची योजना आखली होती, परंतु थिएटर सुरू झाल्यावर प्रेक्षकांची संख्या कमी असल्याने त्यांनी हा प्लॅन रद्द केला.

निर्मात्यांचा असा अंदाज आहे की जर हा बिग बजेट चित्रपट सध्याच्या परिस्थितीत राज्यात प्रदर्शित झाला तर त्याचा व्यवसाय जवळपास १२० कोटींवर जाईल. अशा परिस्थितीत निर्मात्यांनी पुढच्या वर्षी 12 मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित करण्याची योजना तयार केली आहे. सलमान खानच्या मते हा एक मोठा चित्रपट आहे. जेव्हा देशभरात परिस्थिती सामान्य होईल तेव्हाच हा चित्रपट प्रदर्शित होईल.तसे, अशी परंपरा आहे की सलमान खान दरवर्षी ईदला त्याचा चित्रपट प्रदर्शित करत असतो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’