Take a fresh look at your lifestyle.

वाह भाई वाह ! ‘राधे’ चित्रपटाच्या कमाईतून कोरोना बाधितांना करणार मदत

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा भाई जान म्हणजेच अभिनेता ‘सलमान खान’ याचा बहुचर्चित चित्रपट ‘राधे – युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. येत्या १३ मे २०२१ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आतापर्यंत या चित्रपटातील २ गाणी रिलीज झाली आहेत. या दोन्ही गाण्यांना प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली आहे. दरम्यान, ‘राधे’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीच भाईजाजने एक मोठा निर्णय घेतला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर राधे जी काही कमाई करेल त्याचा एक भाग कोरोना बाधित रुग्णांसाठी देण्यात येणार आहे, असे सलमानने सांगितले.

सलमान खान‌ फिल्म्स आणि झी एन्टरटेन्मेंटने‌ यांनी ‘राधे’च्या सर्व माध्यमांमधून होणाऱ्या कमाईचा एक भाग कोरोना बाधित रुग्णांसाठी आवश्यक उपकरणे खरेदी करण्यासाठी देण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. यात मुख्य करून ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, व्हेंटिलेटर आणि इतर आवश्यक उपकरणे खरेदी करण्यासाठी खर्च केला जाईल. सध्या राज्यात आणि देशात कोरोना आवश्यक उपकरणांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण होत आहे. तर दुसरीकडे दिवसेंदिवस रुग्णसंख्या सुद्धा वेगाने वाढत आहे. अश्यातच सलमान खानने घेलेल्या या निर्णयाचे सर्व स्तरांवर भरभरून कौतुक होत आहे.

एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने याबद्दल माहिती दिली आहे. सलमान खानने यापूर्वी सुद्धा अनेक गरजू नागरिकांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. नुकताच त्याने त्याच्या टीमसह गरीब जनतेसाठी आणि व ड्युटी पोलिसांसाठी फूड पॅकेट्स दिले होते. इतकेच नव्हे तर या अन्नाची गुणवत्ता तपासण्यासाठी तो स्वतः देखील उपस्थित होता दरम्यान, राधे चित्रपटात सलमान खान सोबत अभिनेत्री दिशा पटनी मुख्य भूमीकेत दिसणार आहे. दिशा आणि सलमान यांचा एकत्र दुसरा चित्रपट आहे. या आधी हे दोघंही ‘भारत’ चित्रपटात एकत्र झळकले होते. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रभू देवानं केलं आहे. यात रणदीप हुड्डा आणि जॅकी श्रॉफ यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.