Take a fresh look at your lifestyle.

अंतिम’च्या प्रमोशनसाठी बिग बॉस मराठीच्या चावडीवर भाईजानची एंट्री; पहा व्हिडीओ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस मराठी 3’ हा शो सध्या चांगलाच रंगला असून प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळवताना दिसत आहे. दररोज या घरात काही ना काही राडे होताना दिसत असतात. यामुळे शोचा TRP एकदम टॉपला आहे. त्यात मांजरेकरांनी शनिवार रविवारी शाळा भरते आणि कुणाला धपाटे तर कुणाला कौतुकाची थाप मिळते हे २ दिवस ‘बिग बॉस मराठीची चावडी म्हणून ओळखले जातात. हि शनिवार-रविवारची चावडी म्हणजे नुसती धम्माल आणि कल्ला. यानंतर आज रात्री बॉलिवूडचा भाईजान सलमान खान बिग बॉस मराठी 3’च्या चावडीवर खास पाहुणा म्हणून येणार आहे. मग काय ? सोने पे सुहागा अशीच काहीशी प्रेक्षकांची स्थिती झाली आहे.

खरंतर ‘बिग बॉस मराठीच्या चावडीवर सलमान खानने येण्याचे कारण म्हणजे त्याचा आगामी चित्रपट ‘अंतिम- द फायनल ट्रूथ’ याचे प्रमोशन. यामुळे फक्त भाईजान नाही तर त्याच्यासोबत अभिनेता आयुष शर्मा आणि अभिनेत्री महिमा मकवानासुद्धा ‘बिग बॉस मराठीच्या चावडीवर दिसतील.

अधिकृत इंस्टाग्राम पेजवर याचे प्रोमो कलर्स मराठीने शेअर केले आहेत. त्यामुळे हि चावडी एकदम स्पेशल होणार आहे. दरम्यान सलमान खान घेऊन येतोय ऍक्शन आणि फुल्ल ऑन एंटरटेनमेंटचा तडका. शिवाय बिग बॉसच्या घरातून कोण एलिमिनेट होणार आणि कोण सेफ होणार याचा निकालसुद्धा सलमानच्याच हाती असणार आहे. त्यामुळे एकंदरच हि चावडी धमाकेदार असेल.

शिवाय आयुष आणि महिमा येणार म्हणजे हलका फुलका एपिसोड कसा असेल? यामुळे ते दोघेही आपल्या लाडक्या स्पर्धकांसाठी एक हटके टास्क घेऊन आलेले दिसतील. या टास्कमध्ये प्रत्येक स्पर्धकाला अन्य कोणत्याही स्पर्धकाने आपल्या गेमवर नांगर फिरवला आहे असे वाटते अर्थात आपला गेम स्वतःहून खराब केलाय असे वाटत असेल त्याने संबंधित स्पर्धकाच्या फोटोवर नांगर फिरवायचा आहे. या टास्कमध्ये कोण कोणाच्या फोटोवर नांगर फिरवणार आणि कोण तोडणार जुळलेली नाती? हे पाहायला मजा येणार आहे.