Take a fresh look at your lifestyle.

भाईजानचे कुटुंबीय कोरोनाच्या विळख्यात; वहिनीपाठोपाठ आता पुतण्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या कुटुंबातील काही सदस्य सध्या कोरोना विषाणूने प्रभावित झाले आहेत. यामध्ये सलमान खानचा भाई आणि बॉलिवूड अभिनेता सोहेल खान याची पत्नी सीमा खान हीच आधी कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. आता सीमा खाननंतर तिचा १० वर्षांचा मुलगा योआनलाही बुधवारी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यानंतर बीएमसीने खबरदारी घेत सोहेल खानच्या पाली हिल इमारतीचा मजला सील केला आहे.

याआधी खबरदारी म्हणून बीएमसीने सोहेलच्या इमारतीला सील केले होते. जिथे त्याची पत्नी सीमा आणि मुले राहतात. मात्र संपूर्ण इमारत सील करण्याच्या बीएमसीच्या निर्णयावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. कारण ५ पेक्षा जास्त लोक कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतरच संपूर्ण इमारत सील केली जाते. प्रशासनाच्या कोविद संदर्भातील नियमांनुसार, फ्लॅटमध्ये दोन वा त्याहून अधिक लोक संक्रमित आढळल्यास ते निवासस्थान सील केले जाते. मात्र ५ लोकांना संसर्ग झाल्यास तो मजला सील केला जाईल आणि इमारतीमध्ये ५ पेक्षा जास्त रहिवाशी संक्रमित असल्यास संपूर्ण इमारत सिल केली जाईल.

सीमा खानला करण जोहरच्या घरी पार पडलेल्या डिनर पार्टीत सहभागी झाल्यानंतर कोरोना झाल्याचे समोर आले होते. या सेलिब्रिटी पार्टीमध्ये करीना कपूर खान, अमृता अरोरा यांनाही कोरोना विषाणूची लागण झाली आहे. सीमा खानपासूनच इतर सेलिब्रिटींमध्ये कोरोना पसरल्याचे सध्या सांगितले जात आहे. अमृता व्यतिरिक्त करीना, सीमा खान, महीप कपूर आणि मुलगी शनाया कपूर यादेखील कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या विळख्यात सापडल्या आहेत. दरम्यान पार्टीत उपस्थित असलेले करण जोहर, आलिया भट्ट, मलायका अरोरा यांचा रिपोर्ट मात्र निगेटिव्ह आला आहे. परंतू त्यांना ७ दिवसांकरिता होम क्वारंटाईन ठेवले आहे.