Take a fresh look at your lifestyle.

‘मैं चला’! सलमान खानचं नवं रोमँटिक गाणं रिलीज; पहा व्हिडीओ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा भाईजान सलमान खान बऱ्याच दिवसांनंतर अल्बम सॉंगमध्ये दिसतो आहे. हे गाणे अतिशय सुंदर आणि रोमँटिक आहे. या गाण्यामधील सलमानचा अंदाज देखील फार वेगळा आहे. त्याचा लूक पाहून चाहते तर घायाळ झाले आहेत. असे म्हणता येईल कि सलमान खान त्याच्या चाहत्यांसाठी एक सुंदर भेट घेऊन आला आहे. आज २२ जानेवारी २०२२ रोजी सलमानच हे नवं रोमॅंटिक गाणं रिलीज झालं आहे. यामध्ये सलमानसोबत तेलगू अभिनेत्री प्रज्ञा जयस्वाल दिसतेय. तर हे गाणे पंजाबी असून गायक गुरु रंधावा आणि सलमानची जवळची मैत्रीण युलिया वंतूर यांनी गायले आहे. अगदी २ तासातच या गाण्याने लाखभर व्ह्यूज पार केले आहेत.

सलमानने त्याच्या ‘मैं चला’ या गाण्याचा एक टीझर शुक्रवारी सोशल मीडियावर रिलीज केला होता. यानंतर हे गाणे आज रिलीज झाल्यानंतर त्याच्या चाहत्यांची गाण्यास विशेष पसंती दिली आहे. या सुंदर गाण्याचे बोल शब्बीर अहमद यांनी लिहिले आहेत. तर पंजाबी गायक गुरू रंधावा आणि युलिया वंतूर यांनी या गाण्याला आपला आवाज दिला आहे. ‘मैं चला तेरी ओर तू चले ओर कहीं’ असे या गाण्याचे भावनिक बोल आहेत. यातील सलमानचा लूक पाहाल तर तो पंजाबी वेशात दिसतोय. इतकी काय तर कधी लांब केसांमध्ये तर कधी शीख लूक परीधान केलेला सलमान सगळ्यांना भावतोय. तसेच गाण्यातील सलमान आणि प्रज्ञाचा रोमँटिक अंदाजदेखील त्यांची केमिस्ट्री दाखवतोय.

सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, त्याचा ‘अंतिम’ हा चित्रपट गेल्यावर्षी रिलीज झाला होता. यात त्याच्यासोबत महिमा मकवाना आणि आयुष शर्मा यांनी काम केले होते. सलमान खानच्या या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. इतकेच काय तर सलमानचे अनेक चित्रपट येऊ घातले आहेत. त्यामुळे आता प्रतीक्षा फक्त रिलीज डेटची. याशिवाय अभिनेत्री प्रज्ञा जयस्वाल ही एक भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल आहे. जी प्रामुख्याने तेलुगु चित्रपटांमध्ये काम करते. तिला सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणासाठी फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.