Take a fresh look at your lifestyle.

सलमान, पूजा आणि वेंकटेश स्टारर ‘कभी ईद कभी दिवाली’ 2023’मध्ये होणार रिलीज

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीतील दबंग खान आणि भाईजान म्हणून ओळखला जाणारा लोकप्रिय अभिनेता सलमान खान याचा स्वतःचा असा मोठा चाहता वर्ग आहे. त्याचे चाहते भाईजानचा चित्रपट कधी येणार याची वाटच पाहत असतात. त्यात जर सलमानने चित्रपटाची घोषणा केलेली असेल तर मग चाहत्यांची उत्सुकता पाहायलाच नको. तसेच काहीसे सलमानच्या कभी ईद कभी दिवाली या आगामी चित्रपटाबाबत घडले आहे. त्यामुळे आता आपल्या चाहत्यांची उत्सुकता फार न ताणता अखेर या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे.

सलमान खान आणि साजिद नाडियादवाला हि जोडी याआधीही बॉलीवूडला हिट चित्रपट देत होती आणि पुढेही देईल अशी सर्वानाच आशा आहे. त्यामुळे कभी ईद कभी दिवाळी या चित्रपटाकडून सर्वांच्या फार अपेक्षा आहेत. ‘जीत’, ‘जुडवा’, ‘हर दिल जो प्यार करेगा’, ‘मुझसे शादी करोगी’ आणि ‘किक’ नंतर आता दोघेही ‘कभी ईद कभी दिवाली’ हा नवाकोरा चित्रपट घेऊन येत आहेत.

नुकतीच या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे. पुढच्या वर्षी ईदला सलमान खान पुन्हा एकदा चाहत्यांना गिफ्ट देणार आहे. हा चित्रपट २०२३ सालातील ईदला प्रदर्शित होणार आहे.

कभी ईद कभी दिवाली या चित्रपटात मुख्य भूमिकेत सलमान खान आणि त्याच्यासोबत मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत अभिनेत्री पूजा हेगडे दिसणार आहे. या याशिवाय साऊथ स्टार वेंकटेश सुद्धा या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी करीत आहेत. या चित्रपटाची कथा कौटुंबिक असून कॉमेडी असणार आहे.

सलमान दरवर्षी ईदच्या दिवशी चाहत्यांसाठी धमाकेदार चित्रपट घेऊन येतो. रिपोर्ट्सनुसार, ‘कभी ईद कभी दिवाली’ २०२३ च्या फेब्रुवारीमध्ये ऑनस्क्रीन होणार आहे. त्यासाठी मुंबईत मोठा सेट तयार करण्यात आला असून चित्रपटाची टीम सुरु करण्याच्या तयारीत आहे. येत्या १५ फेब्रुवारीपासून या चित्रपटाचे शूटिंग सुरु होत आहे.  विश्लेषक तरण आदर्श यांनी चित्रपटाच्या रिलीज डेटची माहिती देताना ट्विट केले आहे.