Take a fresh look at your lifestyle.

राधे चित्रपटातील बहुचर्चित गाणे ‘सीटी मार’ झाले प्रदर्शित; या गाण्यासाठी सलमानने मानले अल्लू अर्जुनचे आभार

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ईदच्या खास प्रसंगी सलमान खानचा आगामी बहुप्रतिक्षित चित्रपट ‘राधेः युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ रिलीजसाठी सज्ज झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलरनंतर आता नुकतेच रिलीज झालेल्या सलमान खान आणि दिशा पटनीच्या ‘सीटी मार’ या पहिल्या गाण्याला खूप पसंती मिळाली आहे. हे गाणे रिलीज झाल्यानंतर अगदी काही तासांतच त्याला १०,०००हुन अधिक व्ह्यूज मिळाले. खरतर ‘सीटी मार’ हे गाणे २०१७ मध्ये रिलीज झालेल्या डीजे या तेलगू चित्रपटातील अल्लू अर्जुनच्या हिट गाण्याची पुनर्रचित आवृत्ती आहे. यामुळे सलमान खानने या गाण्यासाठी अल्लू अर्जुनचे आभार मानले आहेत.

सलमानने ट्विट करीत लिहिले आहे कि, सीटी मार या गण्याबद्दल अल्लू अर्जुनचे आभार, तु या गाण्यात ज्या प्रकारे सादरीकरण केले, नृत्य केले, शैली दर्शविली, सर्व काही धमाकेदार आहे. काळजी घे आणि सुरक्षित रहा. कुटुंबासाठी खूप प्रेम, खूप प्रेम भावा.’ सलमानच्या या ट्विटवर दाक्षिणात्य स्टार अल्लूने म्हटले आहे कि, ‘सलमान गुरु तुमचे मनापासून आभार. तुम्ही माझे कौतुक केल्याने मला फार आनंद झाला. हे तुमचं प्रेम आहे .. राधेची जादू पडद्यावर पाहण्याची वाट पहात आहे आणि चाहते नक्कीच शिट्टी वाजवत. तुमच्या प्रेमाबद्दल धन्यवाद.’

‘राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ या चित्रपटातील ‘सिटी मार’ हे गाणे दमदार नृत्य आणि रोमँटिक दृश्यांनी भरलेले आहे. या गाण्यात सलमान खान आणि दिशा पटानीची रोमँटिक केमिस्ट्री स्पष्ट दिसत आहे. या ट्रॅकचे संगीत देवी श्री प्रसाद यांनी दिले आहे. तर शब्बीर अहमद या गाण्याचे गीतकार आहेत. या गाण्याला कमल खान आणि इलिया वंतूर यांचा आवाज आहे. तर शेख जानी बाशाने हा पेप्पी डान्स नंबर त्याच्या स्टाईलमध्ये कोरिओग्राफ केला आहे.

सलमान खान सोबत दिशा पटानी, रणदीप हूडा आणि जॅकी श्रॉफ देखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसत आहेत. ‘राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा चित्रपट सलमान खान फिल्म्सने झी स्टुडिओ समवेत सादर केला आहे. सलमान खान, सोहेल खान आणि रील लाइफ प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित हा चित्रपट यंदा ईदच्या निमित्ताने १३ मे २०२१ रोजी थिएटर आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट झी -5 वर ‘पे-पर-व्ह्यू’ सर्व्हिस झी प्लेक्सवर दिसणार आहे.