Take a fresh look at your lifestyle.

सलमान – कॅटरिना या महिन्यापासून सुरू करणार ‘टायगरच्या’ तिसऱ्या पार्टच शूटिंग

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | यशराज फिल्म्सने आपल्या प्रॉडक्शन हाऊसची तयारी सुरू केली आहे. लवकरच यशराज फिल्म्स लवकरच काही नवीन चित्रपटांची घोषणा करणार आहेत. एका वृत्तानुसार, सलमान खान लवकरच आपल्या आगामी ‘राधेः युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ चित्रपटाची उर्वरित शूटिंग दिशा पाटणीसह पूर्ण करू शकेल.आणि फेब्रुवारी 2021 मध्ये कतरिना कैफसह यशराज प्रॉडक्शन लवकरच टायगर मालिकेच्या पुढील चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करू शकेल. ‘टायगर 3’ च्या शूटसाठी सलमान कतरिना सज्ज आहे.

अहवालानुसार चित्रपटाचे वेळापत्रक 8 महिन्यांचे असेल आणि त्याचे शूटिंग अनेक देशांमध्ये केले जाईल.आधीच्या ‘एक था टायगर’ आणि ‘टायगर जिंदा है’ प्रमाणे यावेळीही सलमान आणि कतरीना हीच जोडी असेल.बातमीनुसार सलमान खान आणि आदित्य चोप्रा यांच्यात टायगर सीरिजच्या तिसर्‍या चित्रपटासाठी चर्चा सुरू आहे. जर सर्व काही ठीक झाले तर 2022 च्या ईदमध्ये टायगर फ्रँचायझीचा तिसरा चित्रपट प्रदर्शित होईल.
या अगोदर सलमानने २०१२ मध्ये प्रथम यश राज फिल्म्ससह ‘एक था टायगर’मध्ये काम केले होते. हा चित्रपट जबरदस्त हिट ठरला आणि यानंतर चित्रपटाचा दुसरा भाग असलेला ‘टायगर जिंदा है’ 2017 मध्ये रिलीज झाला जो लोकांनाही आवडला.