Take a fresh look at your lifestyle.

समांतर ट्रेलर रिलीज:स्वप्नील दिसणार दुहेरी भूमिकेत….पहा व्हिडीओ

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन । मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता स्वप्निल जोशी सध्या त्याच्या भूमिकेबद्दल सतर्क होत आहे. स्वप्निल आपली चॉकलेट बॉय म्हणून असलेली ओळख पुसण्याचा प्रयत्न करीत आहे. विविध चित्रपटांमध्ये दिसणारा स्वप्निल लवकरच ‘समांतर’ या वेब सिरीज मध्ये दिसणार आहे. या मालिकेचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.

एमएक्स ओरिजिनल्सची निर्मिती असलेली ‘समांतर’, वेब सिरीजच्या रूपात असणार आहे .कुमार महाजन या सामान्य माणसाच्या जीवनाचा थरारक प्रवास यामध्ये दाखविण्यात आलेला आहे. सुदर्शन चक्रपाणीचा भूतकाळ समजल्यामुळे कुमार महाजन या सामान्य माणूसाचे आयुष्य बदलत जाते. ‘कुमार महाजन’ हि भूमिका स्वप्निल जोशी साकारत आहेत.

या वेब सीरिजमध्ये स्वप्निल जोशी सामान्य माणसाचे सामान्य जीवन जगताना दिसणार आहेत. कुमार आपल्या कुटुंबाच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी काम करत असतो. जर त्याची नोकरी गेली तर त्याच्या आयुष्यात काय घडेल हे या मालिकेतुन समोर येईल. या मालिकेत तेजस्विनी पंडित , स्वप्नील जोशी याच्या पत्नीची भूमिका साकारत असून या भागाच्या वेब सीरिजचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले आहे.

ही समांतर कथा मराठीसह हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेतही प्रदर्शित केली जाईल जेणेकरून समांतर कथा सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी . ‘समांतर’ ७ मार्च रोजी एकाच वेळी मराठीसह अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होईल.