Take a fresh look at your lifestyle.

उलटी लटकतेय समंथा; हटके अंदाजात करतेय योगा

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। चित्रपटसृष्टीतील कलाकार नेहमीच आपल्या फिटनेसबाबत काळजी घेत असतात. कुणी जिम करत तर कुणी योगा. बहुतेक सेलिब्रिटी आपले व्यायामाचे, योगाचे व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. चाहत्यांना फिटनेसचेही धडेसुद्धा देत असतात. योगा असो किंवा व्यायाम त्यात काही तरी वेगळं, हटके असं करून चाहत्यांचे लक्ष आपल्याकडे वळवण्यासाठी सगळेच प्रयत्न करत असतात. असाच हटके अंदाजात व्यायाम करतानाच फोटो समंथा या दाक्षिणात्य अभिनेत्रीने शेअर केलाय. तिचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

अभिनेत्री समंथा अक्कीनेनी या अभिनेत्रीने आपल्या सौंदर्याने आपला चाहता वर्ग तयार केला आहे. अभिनयासोबतच तिच्या फिटनेसाठीही ती प्रसिद्ध आहे. ती नेहमीच तिच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर फिटनेस व्हिडीओस शेअर करत असते. ती योग साधनेत पारंगत असल्याचे तिच्या या व्हिडीओ आणि फोटोजवरून लक्षात येते. नुकताच तिने एक योग करतानाचा आपला फोटो सेशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यात ती कठिन असे योगासन करीत आहे. एका दोरीवर ती चक्क उलटी लटकली आहे. काही दिवसांपूर्वीच तिने असाच एक व्हिडीओ पोस्ट केला होता, त्यात ती कठीण योगासन करत आहे. त्यामुळे ते पाहून तिचे चाहते योग करण्यासाठी प्रेरित होत असतात. इतकेच नव्हे तर तिच्या या फोटो आणि व्हिडीओज ला भरभरून कमेंट करतात.

समंथा ही प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुन याची सून असून अभिनेता नागा चैतन्य याची पत्नी आहे. समंथा तिचा व्यायाम कधीच चुकवत नाही. ती नियमित व्यायाम करते. तसेच तिने काही दिवसांपूर्वीच प्लांट बेस डायट सुरू केला आहे. हा आहार मांसपेशींना मजबूत करण्यासाठी मदत करतो अस तिचं म्हणणं आहे. समंथा सोशल मीडिया फारच सक्रिय असते तिच्या व्यायामाचे तसेच विविध गोष्टींबद्दलच्या पोस्ट ती सतत शेअर करत असते. शिवाय तिला बगिच्यांमध्ये झाडे लावायला आवडतात. त्यानंतर योगा हा तिचा आवडता विषय असल्याचं तिने म्हटलं होतं. ती लवकरच एका नव्या तेलुगू आणि तमिळ चित्रपटात दिसणार आहे.