Take a fresh look at your lifestyle.

सिद्धार्थच्या अंत्यसंस्काराला आलेल्या संभावनाची पोलिसांसोबत हुज्जत; व्हिडीओ पाहून चाहते भडकले

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचे गुरुवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यानंतर सिद्धार्थ ओशिवरा येथे राहत असल्यामुळे काल शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास ओशिवरा स्मशानभूमीत त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

या दुःखद प्रसंगी अनेको कलाकार आणि दिग्गज मंडळी उपस्थित होती. दरम्यान अभिनेत्याच्या अंत्यसंस्कारालाआलेली अभिनेत्री संभावना सेठ आणि तिचा नवरा अरविंद यांची ओलिसांसह धक्काबुक्की झाली आणि हा वाद वाढला. दरम्यान संभावना इतक्या मोठमोठ्याने बोलत हुज्जत घालत होती कि मिडीयाचेही कॅमेरा तिच्यावर स्थिरावले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे आणि यानंतर नेटकऱ्यांनी मात्र संभवनावर चांगलेच ताशेरे ओढले आहेत.

सिद्धार्थच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी गर्दी केली होती. हे अपेक्षित असल्यामुळे स्मशानभूमीत मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान सिद्धार्थचे अंत्यदर्शन घेण्यासाठी आलेली अभिनेत्री संभावना सेठ आणि तिचा नवरा अविनाश द्विवेदी यांनी मुंबई पोलिसांशी मोठ्या आवाजात हुज्जत घातल्याचे दिसून आले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात संभावना आणि अरविंद स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारातून आत जात असताना अरविंदला पोलिसांनी गेटवर अडवले. त्यामुळे संभावना, अरविंद आणि पोलिसांमध्ये वाद सुरू झाला. इतकेच नव्हे तर त्यांच्यामध्ये धक्काबुक्कीही झाली. यामुळे संतप्त झालेल्या संभावनाने पोलिसांवर आरडाओरडा केली. त्यांच्यात नेमका वाद कोणत्या कारणामुळे झाला हे कळले नसले तरीही संभावनाचा नवरा अरविंद फॉर्मल कपड्यांमध्ये आल्यामुळे गैरसमज निर्माण झाला असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान सिद्धार्थचे चाहते मोठ्या संख्येने ओशिवरा स्मशानभूमी परिसरात जमले होते. त्याचे अंतिम दर्शन घेण्यासाठी ते ताटकळले होते. तसेच प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, फोटोग्राफ्रर यांनाही प्रवेशद्वाराबाहेरच उभे केले होते. अशात संभावना व तिचा नवरा अविनाश आत जाताना त्यांच्या मागोमाग काही लोक आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे पोलिसांनी अविनाशला रोखले आणि त्यातच त्याचे रंगीत कपडे आणि हातात मोबाईल पाहून पोलिसांचा गैरसमज झाला. परिणामी अविनाश आणि पोलिसांत वाद व धक्काबुक्की झाली, म्हणून संभावनाही भडकून पोलिसांवर ओरडू लागली. त्याचवेळी आतमध्ये असलेली एक व्यक्ती संभावनाला हात जोडून ओरडू नकोस अशी विनंती करताना दिसत आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला आहे कि हा सर्व प्रसंग पाहून सिद्धार्थचे चाहते संभवनावर भयंकर चिडले आहेत. काहींनी तर थेट तिची अक्कल काढली आहे. तर काही नेटकऱ्यांनी मात्र तिची बाजू घेतली आहे. एका नेटकऱ्याने लिहिले कि, हिला काहीही अक्कल नाहीये, जिथे जाते तिथे भांडते. तर दुसऱ्या युजरने लिहिले कि, आपण कुठे आलोय, का आलोय, कश्याला आलोय इतकं पण काळात नाही का हिला? अन्य एकाने लिहिले, अरे काय आहेत हे लोक. याना प्रसंग काळात नाही का? सेलिब्रिटी असून डिग्निटी नाहीये ह्यांच्यात. तर अन्य एका युजरने म्हटले कि, पांढरे टी शर्ट घातलेली व्यक्ती अक्षरशः हातापाया पडून शांत राहण्याची विनंती करतेय तरीही हि गप्प बसत नाही. काय बोलायचं हिला? किमान त्या माणसाची अवस्था पाहून तरी गप्प बसायचंस. याशिवाय अन्य एका युजरने लिहिले, या संभावनाला दोन कानफडात लगावून हाकलवून द्यायला हवं होत, इतकाही काळात नाही आपण कुठे आलोय. अश्या प्रतिक्रिया देत नेटकाऱ्यानी आपला संताप व्यक्त केला आहे. तर काही नेटकऱ्यांनी तिची बाजू घेत ल म्हटले कि तिच्या नवऱ्याला मारलं म्हणून ती बोलली त्यात काहीच चुकीचं नाहीये.

Leave A Reply

Your email address will not be published.