Take a fresh look at your lifestyle.

आप’ल्याला ह्यात ओढू नका! आप’च्या उमेदवार यादीत संदीप पाठकचे नाव; अभिनेत्याचे ट्विट चर्चेत

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। पंजाबची विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर आप पार्टीची मोठी चर्चा आहे. यानंतर आता हा पक्ष राज्यसभा निवडणुकीसाठी तयारी करतोय. दरम्यान आम आदमी पार्टीमध्ये मराठी अभिनेता संदीप पाठक यांना पंजाबमधून राज्यसभेचं तिकीट दिलं आहे. होय होय तुम्ही बरोबर वाचताय. मुख्य म्हणजे सोशल मीडियावर तसे पोस्टर शेअर होत आहे आणि म्हणून अभिनेता संदीप पाठक चांगलाच चर्चेत आला आहे. ‘आप’ने राज्यसभेसाठी त्यांच्या पक्षाचे नेते संदीप पाठक यांच्या नावाची घोषणा केली. पण बऱ्याच ठिकाणी आता संदीप पाठकचा फोटो वापरला जातोय आणि ते फोटो व्हायरल होत आहेत. त्यावर संदीप पाठकने दिलेली प्रतिक्रिया तर त्याहून जास्त चर्चेत आहे.

मराठी अभिनेता संदीप पाठक याचा फोटो आम आदमी पार्टीचा उमेदवार म्हणून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे पाहून स्वतः संदीप पाठक सुद्धा चक्रावला आहे. त्याने संबंधित पोस्ट आपल्या अधिकृत सोशल मीडिया ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. यासोबत त्याने कॅप्शनदेखील लिहिले आहे. यात संदीप पाठक याने लिहिलं आहे कि, “तो मी नव्हेच! आप चे डॉ. संदीप पाठक ह्यांची पंजाबमधून राज्यसभेवर निवड झाली आहे माझी नाही. बऱ्याच ठिकाणी, काही चॅनल वर माझे फोटो वापरत आहेत. ‘आप’ल्याला ह्यात ओढू नका!”, अशा आशयाचं ट्विट संदीप पाठकने केलं आहे. यात त्याने आम आदमी पक्षाला आणि दिल्लीचे मुख्यमंत्री,आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना टॅग केल आहे.

अभिनेता संदीप पाठकने हे ट्विट करून लोकांमध्ये पसरलेला गैरसमज दूर करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. मात्र तरीही सोशल मीडियावर मात्र संदीपच्या या उमेदवारीची चर्चा एकदम जोरात चालू आहे. त्यामुळे संदीपने केलेल्या या ट्विटच्या कमेंट बॉक्समध्ये अनेक लोकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकंदर पाहता ट्विटरवर हशा पिकला आहे. अनेकांनी या ट्विटवर हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत. तर काहींनी उपरोधाने संदीपचे अभिनंदन केले आहे.