Take a fresh look at your lifestyle.

बॉलिवूडचा संजू बाबा पाकिस्तानच्या माजी राष्ट्राध्यक्षांच्या भेटीला; भारतीयांनी व्यक्त केला संताप

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत राहणे हे कलाकारांचे रोजचे शेड्युल झाले आहे. त्यामुळे कोणत्याही कारणाने आपण चर्चेत येण्यासाठी विविध स्टंट केले जातात. आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. नेहमीच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कटू राहिले आहेत. अनेकदा पाकिस्तानकडून भारतावर दहशतवादी क्रूर हल्ले केले आहेत. ज्यामध्ये कित्येक निष्पापांचा नाहक बळी गेला आहे. यानंतर आता सोशल मीडियावर एका भेटीचा फोटो व्हायरल होतोय. ज्यामध्ये बॉलिवूड अभिनेता संजय दत्त आणि पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ दिसत आहेत. हा फोटो पाहून अनेक भारतीयांच्या डोक्यात तिडीक गेली आहे.

भारतीय सिनेसृष्टीतील स्टार अभिनेता संजय दत्त म्हणजेच संजू बाबा पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्या भेटीसाठी का गेला होता..? कश्यासाठी भेटला..? गरज काय होती..? असे अनेक प्रश्न या फोटोमुळे निर्माण झाले आहेत. अनेकांनी हा फोटो पाहिल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया आणि प्रश्नांचा भडीमार केला आहे. या फोटोत परवेझ मुशर्रफ व्हील चेअरवर बसल्याचे पहायला मिळत आहे. तर संजय दत्त त्यांच्यासमोर उभा आहे. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे आणि संतापाची लाट उसळली आहे.

 

या फोटोवर अनेक नेटकऱ्यांनी विविध कमेंट करण्यास सुरुवात केली आहे. या फोटोमूळे अनेकांनी संजय दत्त याला सोशल मीडियावर ट्रोलिंग काय असत ते दाखवून दिल आहे. तर काही लोकांच्या मते संजय दत्त मुशर्रफ यांच्यासोबत हँगआऊट करतोय अशा प्रकारचे खोचक टोमणे देखील लगावण्यात आले आहे. आता हा पब्लिसिटी स्टंट आहे कि या भेटीमागे काही वेगळं शिजतंय ते ज्याचं त्याला ठाऊक. मात्र सोशल मीडियावर ट्रोलिंगचा गडगडाट काही थांबेल अशी शक्यता दिसत नाही.