हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज मराठमोळा अभिनेता आणि मराठीसह बॉलिवूड इंडस्ट्री गाजवणाऱ्या श्रेयस तळपदेचा वाढदिवस आहे. २७ जानेवारी १९७६ रोजी मुंबईतील अंधेरीत जन्मलेला श्रेयस आज इतका मोठा कलाकार झाला आहे कि त्याचे लाखो चाहते आहेत. अलीकडेच तेलगू चित्रपट पुष्पा च्या हिंदी दाबला त्याने आवाज दिल्यामुळे तो फारच चर्चेत आला आहे. तर सध्या श्रेयस छोट्या पडद्यावर मालिकेत काम करताना दिसतोय.
https://www.instagram.com/tv/CZL7CSOlaRw/?utm_source=ig_web_copy_link
झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘माझी तुझी रेशीमगाठ’ यामध्ये श्रेयस यश नामक मुख्य नायकाची भूमिका साकारताना दिसतोय. या मालिकेत तो अभिनेत्री प्रार्थना बेहरेसोबत दिसतोय. तर यांच्याव्यतिरिक्त मालिकेत ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि प्रेक्षकांचा लाडका होस्ट, लेखक संकर्षण कऱ्हाडे देखील मुख्य भूमिकेत दिसत आहेत. आता आज श्रेयसच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संकर्षणने एक सुंदर अशी खास बर्थडे पोस्ट लिहिली आहे. चला तर पाहुयात काय म्हणतोय संकर्षण… आपल्या रील लाईफ मित्राबद्दल..
संकर्षणने फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे. संकर्षण माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत मुख्य नायक यशचा मित्र समीरची भूमिका साकारत आहे. या मालिकेदरम्यान त्याला खऱ्या खुऱ्या आयुष्यात एक मित्र मिळाल्याचे त्याने या पोस्टमध्ये लिहिले आहे. या पोस्टमध्ये संकर्षणने लिहिले कि, दोस्तं …. यार ….. भाई ……. कलाकार….. सहकलाकार ….. तू खरंच खूप चांगला आहेस.. माझं तुझ्यावर खरंच खूप मनापासून निस्वार्थी प्रेम आहे..
माझ्या मनात तुझ्याविषयी नितांत आदर आहे ..” आणि हे सगळं तू तूझ्या वागण्यातूनच मला वाटायला भाग पाडलं आहेस.. आजवर एक अनुभवी, यशस्वी अभिनेता म्हणुन तू माझ्यावर कधीही, एकदाही, वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्नं केला नाहीस.. तु तुझ्या असण्याचं, वलयाचं माझ्यावर कधिही दडपण आणलं नाहीस.. माझं कौतुकच केलंस आणि मुख्य म्हणजे माझ्या माघारी लोकांनी केलेलं माझं कौतुक मला येऊन सांगीतलंस. तुझं मन खरंच खूप मोठं आहे.
पुढे लिहिले, स्वत:च्या कामाविषयी आत्मविश्वास असलेले लोक ईतरांची निंदा करण्यात वेळ घालवत नाहीत असं म्हणतात.. तसा तू आहेस. तुझ्यासोबतच्या ह्या ७ महिन्यांच्या काळात मी तुला कुणाची निंदा करतांना ऐकलं नाही. म्हणुनच .. माझ्या आयुष्यात आजवर जे जे जेष्ठ किंवा अनुभवी कलाकार आले ज्यांनी मला प्रेमानेच वागवलं आणि माझ्या मनांत आयुष्यभराची आदराची जागा मिळवली त्यांच्या पंक्तीत तू आहेस आणि कायम राहाशील. शिवाय समीर म्हणुन मी काम केल्याने माझ्या लोकप्रियतेत, लोकांच्या माझ्यावरच्या प्रेमात जी भर पडलीये आणि त्यामुळे मला जे जे काही म्हणुन मिळतंय त्याचं सगळं श्रेय श्रेयस दादाचंच आहे. निर्वीवाद..
पुढे, दादा तुला शुभेच्छा अशा देतो कि, तुला हवं ते सगळं मिळु दे .. तुझ्या इथुन पुढच्या सगळ्या कलाकृतींना घवघवीत यश मिळु दे.. तुझ्या कलाकृतींना भाषेचं बंधन न राहता तु सगळ्या जगांत लोकप्रियता मिळव.. एक नवरा म्हणुन सुख, बाप म्हणुन अभिमान, कलाकार म्हणुन यश आणि माणुस म्हणुन समाधान तुला आयुष्यभर मिळत राहावं हीच देवाला प्रार्थना..
Discussion about this post