Take a fresh look at your lifestyle.

तेलुगू गाण्यावर थिरकली मराठमोळी संस्कृती; पाण्यातच केल्या ट्रेंडिंग डान्स मूव्ह्स

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आजकाल सोशल मीडियावर रिल्सचा जमाना आला आहे. चॅटिंग वेटिंग सगळं आता जूनं झालंय. जर पटकन प्रसिद्ध व्हायचं असेल तर सोशल मीडियाशिवाय पर्याय नाही. हा फंडा सेलिब्रिटींनी बरोबर जाणला आहे. त्यामुळे सिनेइंडस्ट्री कोणतीही असो त्यातील सेलिब्रिटी सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सक्रिय असतात. त्यात इंस्टा रील तर सगळ्यांसाठी जीव का प्राण झाले आहेत. एकवेळ जेवण देऊ नका पण रिल्स बनवू द्या अशी आजची परिस्थिती आहे. यावर एखाद गाणं ट्रेंड करू लागलं कि काही विचारूच नका. अशाच एका तेलुगू गाण्याची भूल मराठमोळ्या संस्कृतीला पडली आहे. तसा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर ट्रेंड करतोय.

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री संस्कृती बालगुडेला आपण सारेच जाणतो. सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणारी संस्कृती अनेकदा विविध फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येत असते. यावेळी संस्कृती मित्र मैत्रिणींसोबत व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसली आहे. सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी ती एका पुलसाईड ठिकाणी गेल्याचे दिसली. अशावेळी आनंदाला आणखीच चार चांद लावण्याचा मोह काही तिला आणि दोस्त मंडळींना आवरला नाही. मग काय बनवला ना रील…

संस्कृती आणि तिच्या मित्र मंडळींनी ‘रा रा रेडी’ या तेलुगू गाण्यावर पाण्यातच रील बनवला आहे. त्यात सगळ्यात पुढे संस्कृती. बहुदा पाण्यात रा रा रेड्डी वर मूव्ह्स करून रिल्स बनविणारा हा पहिलाच ग्रुप असावा. त्यामुळे सोशल मीडियालाही या व्हिडिओची भूल पडलीच आणि हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. संस्कृतीच्या भन्नाट वॉटर मूव्ह्स पाहून नेटकऱ्यांच्याही काळजाचं पाणी झालं नसेल तर विचारा..

संस्कृतीच्या या व्हिडिओला दहा हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. शिवाय अनेक नेटकऱ्यांनी आणि कलाकारांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण काही म्हणा.., संस्कृतीचा हा पानीवाला डान्स पाहून कुणालाही थिरकावं वाटेल एव्हढं नक्की.