Take a fresh look at your lifestyle.

संस्कृतीचं फोटोशूट आणि फोटोवरच कॅप्शन; दोन्ही कसं पर……फेक्ट

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री संस्कृती बालगुडे हि सुंदर तर आहेच सोबतच ती अभिनय शैलीत देखील निपुण आहे. अनेक विविध धाटणीच्या भूमिका साकारत संस्कृतीने प्रेक्षकांच्या मनात हक्काची जागा निर्माण केली आहे. तिने आजवर बऱ्याच अवघड भूमिका अगदीच सोप्या पद्धतीने सादर करीत रसिकांची मनं जिंकली आहेत. सध्या संस्कृती सोशल मीडियावर चांगलीच ऍक्टिव्ह असते. नुकताच तिने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत तिने सुंदर असं कॅप्शन देखील दिल आहे. या फोटोमुळे आणि सोबतच्या कॅप्शनमुळे ती चांगलीच चर्चेत आहे.

संस्कृती सोशल मीडियावर तिचे फोटो, व्हिडिओ नेहमीच पोस्ट करत असते. तिने शेअर केलेल्या काही फोटोंची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. अलीकडेच तिने निळ्या रंगाच्या सहावारी साडीत फोटोशूट केले होते. हे फोटो तिने आपल्या ऑफिशियल अकाउंटवर शेअर केले आहेत. खूप दिवसांनी सारं दाटून आलंय…सगळ्या आठवणींना मन भेटून आलंय….!”_ प्रतिक्षा’. “…… निर्मळ, कोमल, तेज ग जैसे तुटत्या तार्याचं….” अशी दोन वेगवेगळी आणि मोहक असे कॅप्शन तिने हे फोटो शेअर करताना दिले आहे. संस्कृतीच्या चाहत्यांनी तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा अगदी पाऊस पाडला आहे. त्यामुळे तिच्या या फोटोशूटला आणि कॅप्शनला परफेक्ट म्हणायला काही हरकत नाही.

संस्कृतीचा ‘धरला माझा हात’ हा म्युझिक व्हिडीओ काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘सांगतो ऐका’ या सिनेमानंतर निवडुंग, शिव्या, एफयु अश्या विविध चित्रपटांमधून ती रुपेरी पडद्यावर झळकली होती. ‘सर्व लाइन व्यस्त आहेत’ या चित्रपटात ती शेवटची दिसली होती. मात्र आता लवकरच ती ‘८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! या सिनेमात दिसणार आहे. संस्कृतीसह या चित्रपटात अभिनेता शुभंकर तावडे,शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, ,राधिका हर्षे – विद्यासागर, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ .निखिल राजेशिर्के हे सारेच महत्वाच्या भूमिका साकारणार आहेत. अभिनेता पुष्कर श्रोत्री या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसेल.