Take a fresh look at your lifestyle.

गहिवरलेलं मन.. डोळ्यात पाणी आणि तोंडभर कौतुक; पश्या बघ काय कमावलंयस तू…

दिघेंच्या भूमिकेसाठी प्रसादचे खास व्यक्तीकडून कौतुक

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या शुक्रवारी १३ मे २०२२ रोजी प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर – मुक्काम पोस्ट ठाणे’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. धर्मवीर हा चित्रपट शिवसेनेचे नेते आणि ठाण्याचा ढाण्या वाघ अशी ओळख असलेले शिवसैनिक आनंदराव दिघे यांच्या जीवनावर आधारित आहे. ते फक्त नेते नव्हते तर लोकांसाठी लोकांमध्ये काम करणारे लोकनेते होते. आज ते हयात नसले तरीही त्यांचा आदरयुक्त धाक ठाण्यात कायम आहे. यामुळे ते कोण होते आणि काय होते हे आजच्या पिढीलाही माहित व्हावे म्हणून या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. या चित्रपटातील आनंद दिघे यांची भूमिका अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक याने साकारली आहे आणि अव्वल साकारली आहे. यासाठी अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे. ज्यामध्ये मराठी अभिनेता संतोष जुवेकरच्या आईचाही समावेश आहे.

अभिनेता संतोष जुवेकर याने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याची आई दिसतेय. त्यांनी आपण धर्मवीर – मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट पाहिल्याचे आपल्या लेकाला सांगितले आणि तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद अगदी टिपण्याजोगा होता.

चित्रपट पाहून आपण किती आनंदी झालो आणि प्रसादने किती सुंदर काम केले आहे हे बोलताना त्या किंचितही थांबू इच्छित नव्हत्या. इतकेच नव्हे तर प्रसाद यॉर्कच्या धर्मवीर चित्रपटाच्या ज्या २० फूट कटआउटने लोकांचे लक्ष वेधले होते त्याचा फोटोही त्यांनी काढला होता. मुख्य म्हणजे त्या फोटोशी संवाद साधताना त्या अतिशय निर्मळ आणि उत्साही दिसून आल्या. संतोषने हा व्हिडीओ बनविला आणि सोशल मीडियावर पोस्टसुद्धा केलाय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

एखादा बायोपिक करणं आणि त्यातील मुख्य व्यक्तिरेखा साकारणं दोन्हीही कठीण असलं तरीही त्या प्रतिमेला धक्का न लावता प्रसादने हि भूमिका वठवली आहे. हेच सांगताना संतोषची आई अतिशय भारावली होती. हा व्हिडीओ शेअर करताना संतोषने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, पश्या बघ काय कमावलंयस तू. माझी आई आज तिच्या आनंद दिघे साहेबांना बघून आली. याशिवाय संतोषच्या आईने प्रसादसह त्याच्या पत्नीचेही कौतुक केले आहे.

त्या म्हणाल्या कि, त्याच्या पाठीशी त्याची बायको आहे. यापुढे त्या काही बोलणारच इतक्यात संतोष म्हणतो बायकोच सोड चित्रपटाबद्दल बोल. यावरून प्रसादची पत्नी मंजिरी ओकने त्याचे कान टोचताना कमेंट केली आहे. मंजिरीने लिहिले कि, काकू कित्ती कित्ती बरा वाटलं हे बघून.. खूप आभार! पुढे लिहिते कि, संत्या चोंढ्या बायकोच सोड का रे..? त्यांच आहे माझ्यावर प्रेम… तुला काय त्रास होतोय..? पण तरीपण खूप प्रेम.. नेहमीच

यापुढेही व्हिडिओत बोलताना संतोषची आई भाऊ झाल्याचे पहायला मिळाले. चित्रपटाविषयी आणि प्रसाद विषयी बोलताना त्या म्हणाल्या कि, “प्रसादने खूप सुंदर काम केलय. असं वाटलं प्रत्यक्षात आनंद दिघेच आलेत की काय. चित्रपट पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं. वादळवाटपासून मी प्रसादचं काम पाहतेय. पण या चित्रपटात त्याने खूपच छान काम केलंय. प्रसादला मला भेटून त्याला कडकडून मिठी मारायची आहे. त्याने या चित्रपटातून खूप नाव कमावलंय’, असे त्या म्हणतायत. प्रसादला मिळणारे प्रेम पाहून असेच म्हणावे वाटतेय कि, हीच तो पोच पावती आणि हाच तो क्षण..!