Take a fresh look at your lifestyle.

लता दीदींसाठी अयोध्येत साधुसंतांनी केले होमहवन आणि महामृत्युंजय पाठ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून त्या रुग्णालयात आहेत. त्यांना घरातील कर्मचाऱ्याच्या सानिध्यात आल्यामुळे कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. यानंतर त्यांना न्यूमोनिआचीदेखील लागण झाल्याचे समजले. वयवर्षे ९२ असल्यामुळे त्यांची प्रकृती पाहता तातडीने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दीदींवर उपचार सुरु केले. यानंतर रुग्णालयात दाखल केल्यापासून अद्याप त्या आयसीयूमध्येच उपचार घेत आहेत. दीदींचे जगभरातील चाहते दररोज त्यांच्यासाठी प्रार्थना करीत असतात. अश्यातच अयोध्येतील साधुसंतांनी दीदींच्या प्रकृतीसाठी महामृत्युंजय जपाचा पाठ केला आहे. शिवाय पंतप्रधानांना एक विशेष आवाहन देखील केले आहे.

लतादीदींची प्रकृती सुधरावी यासाठी अयोध्येत महामृत्युंजय मंत्राचा जप आणि होमहवन करण्यात आले आहे. शिवाय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लवकरात लवकर लतादीदींची भेट घ्यावी, अशी इच्छा या होमहवनामध्ये सहभागी जगद्गुरू परमहंस आचार्य महाराजांनी व्यक्त केली आहे. गुरुवारी मिळालेल्या माहितीनुसार आता दीदींच्या तब्येतीत आंशिक सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे. याबाबतची माहिती लता दीदींच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवरुन देण्यात आली आहे.

लतादीदींवर रुग्णालयात उपचार सुरु केल्यापासून त्यांच्या प्रकृतीबाबत सोशल मिडीयावर अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. मध्यंतरी या अश्या अफवांचं बरच पेव फुटलं होतं. त्यामुळे दीदींच्या अधिकृत हॅण्डलवरुन आता त्यांच्या प्रकृतीची माहिती चाहत्यांनी दिली जात आहे. शिवाय त्यांच्या कुटुंबीयांनी चाहत्यांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान गुरुवारी सकाळी दीदींची एक्सट्यूबेशनची (तीव्र व्हेंटिलेटर बंद करून पाहिला) चाचणी करण्यात आली. यानंतर त्यांची प्रकृती सुधारण्याची आंशिक चिन्हे दिसत असल्याचे डॉक्टरांनी सांगिले आहे. सध्या मुंबई बरीच कॅंडी रुग्णालयात डॉ. प्रतित समदानी यांच्या मार्गदर्शनाखालील डॉक्टरांच्या टीमच्या निरीक्षणाखाली दीदींवर उपचार सुरु आहेत.