सारा अली खानचे आई अमृतासोबत गोल्डन क्षण; मायलेकीचा अनोखा सफरनामा
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री सारा अली खान हि सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे चाहत्यांच्या संपर्कात नेहमीच असते. तिचे चाहतेही सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओ लाईक करून आपल्या प्रेमाचा वर्षाव करत असतात. सारा कामाच्या बाबतीत टॉप असल्यामुळे आज आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिच्या नावाचा उल्लेख आहे. पण सध्या सारा आराम करताना दिसली आहे. आईसोबत मस्त इटली टूर एन्जॉय करताना सारा दिसली. तिने सोशल मीडियावर या सफरीचे खूप फोटो शेअर केले आहेत. ज्यावर लाईक्सचा वर्षाव पडतो आहे.
साराने नुकतेच आपल्या इंस्टाग्रामवर आई सोबत फिरतानेचे काही फोटो शेअर केले आहेत. आई अमृता सिंगसोबत इटलीत ती आपल्या सुट्ट्यांचा मस्त मनसोक्त आनंद घेत आहे. इंग्लिश ऑथर चार्ल्स डिकन्स यांच्या लेखनातील एक प्रसंग लिहीत साराने आपल्या आईसोबतचे हे क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. साराने लिहिलंय कि, …. आणि लाटांमधील आवाज नेहमीच फ्लॉरेन्ससोबत कुजबुजत असतो, त्यांच्या अविरत कुरकुरात, प्रेमाचे आणि फक्त प्रेमाचे, शाश्वत आणि अमर्याद, या जगाच्या किंवा काळाच्या शेवटच्या मर्यादेने बांधलेले नाही, परंतु स्थिर, समुद्राच्या पलीकडे, आकाशाच्या पलीकडे, दूरच्या अदृश्य देशात! – चार्ल्स डिकन्स
या फोटोंपैकी एका फोटोत साराने निऑन ग्रीन कलरचा क्रॉप टॉप निऑन पिंक हॉट पँट परिधान केली आहे. तर या आउटफिटसोबत तिने पोलो कॅप घातली आहे. इतकंच नाही तर या आउटफिटसोबत तिने मॅचिंग शूजही खूप स्टायलिश दिसत वाईट. तर अन्य एका फोटोमध्ये ती आई अमृतासोबत दिसत आहे. या फोटोत मायलेकी दोघींच्याही चेहऱ्यावर ग्लॅमर झळकतो आहे. सारा आणि अमृताच्या व्हेकेशनचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडले आहेत. तर या फोटोंमधील आई- मुलीच्या बॉन्डिंग युजर्सने जास्त पसंती दिली आहे.