Take a fresh look at your lifestyle.

दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबूच्या नावावर असाही विक्रम

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूच्या नावावर एक अनोखा विक्रम नोंद झाला आहे.काल ९ ऑगस्ट रोजी महेश बाबूचा वाढदिवस होता. करोनाचा संसर्ग पाहता महेश बाबूने आपला वाढदिवस कुटुंबीयांसोबत साजरा केल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे शुभेच्छांचा वर्षाव केला होता. आता मात्र वाढदिवशीच महेश बाबूने एक नवा विश्वविक्रम केल्याचे समोर येत आहे.

यासंदर्भात सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत महेश बाबूने विश्व विक्रम केल्याची माहिती दिली आहे.’महेश बाबूच्या चाहत्यांनी त्याचा वाढदिवस संस्मरणीय बनवला आहे. महेश बाबूच्या चाहत्यांनी सर्व विश्व विक्रम मोडले आहेत. चाहत्यांनी महेश बाबूला शुभेच्छा देण्यासाठी जवळपास ६०.२ मिलियन ट्विट्स केले आहेत. त्याबरोबर #hbdmaheshbabu #maheshbabu चा वापर केला आहे’ असे पोस्टमध्ये म्हटले आहे.

महेश बाबूने आजवर अनेक दक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच तो दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीमधील अभिनेता आहे. महेश बाबूचा चाहता वर्ग देखील खूप मोठा आहे.

Comments are closed.