Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘त्यांना माझा नंबर तोंडपाठ..’; असं आहे सायली संजीव आणि अशोक मामांचं बाप- लेकीचं नातं

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 26, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Sayali Sanjeev_Ashok Saraf
0
SHARES
133
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री सायली संजीव गेल्या काही दिवसांपासून तिच्या विविध चित्रपटांमुळे प्रचंड चर्चेत आहे. ‘हर हर महादेव’ चित्रपटानंतर आता ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटामुळे सोशल मीडियावर सायली गाजतेय. सध्या ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाच्या प्रमोशनमुळे ती विविध ठिकाणी स्पॉट झाली.

View this post on Instagram

A post shared by Goshta Eka Paithanichi (@paithanithefilm)

यावेळी तिने अनेक किस्से, आठवणी माध्यमांसोबत शेअर केल्या. दरम्यान ती अनेकदा तिच्या बाबांच्या आठवणीत भावुक होताना दिसली. गतवर्षी तिच्या वडिलांचे निधन झाले. तिच्या आयुष्यात ती बाबांच्या फार जवळ असल्यामुळे त्यांच्या निधनाने ती खचून गेली. यानंतर तिच्या आयुष्यात अशोक मामांनी बापासारखी भूमिका निभावली. त्यामुळे सायली आता ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना ‘पप्पा’ अशी हाक मारते. याविषयी तिने काही आठवणी शेअर केल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by सायली संजीव (@sayali_sanjeev_official)

एका मुलाखतीत सायली संजीवला अशोक मामांशी असलेल्या नात्याबद्दल काही प्रश्न विचारले गेले. यावेळी तिने काही गोष्टी शेअर केल्या. ‘तुझ्या करियरमध्ये भेटलेल्या लोकांमध्ये तुला खूप काही शिकायला मिळालं असं कोण आहे?’ यावर तिने अशोक सराफ यांचं नाव घेतलं. तू म्हणाली कि, ‘या नावाशिवाय माझं म्हणणं पूर्णत्वास येणार नाही.’ पुढे म्हणाली कि, ‘ते मला मुलगी मानतात. कारण झी मराठीवरील ‘काहे दिया परदेस’ सिरियल सुरू झाल्यावर अनेकांना मी निवेदिता सराफ यांच्यासारखी दिसत असल्याने मी अशोक मामा आणि निवेदिता सराफ यांचीच मुलगी असल्याचे वाटले. हे ऐकून अशोक मामांनी देखील ती मालिका पाहिली आणि आपल्याला मुलगी असती तर ती अशीच असती म्हणत त्यांनीही मला मुलगी मानलं. एकदा मी सहज त्यांना विचारलं की मी तुम्हाला काय म्हणू.. त्यावर ते म्हणाले तुझ्या वडीलांना तू बाबा म्हणतेस तर मला पप्पा म्हण..’

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

पुढे म्हणाली, ‘माझे वडीलही माझ्या कामामध्ये कधी इतकं लक्ष देत नव्हते तितकं अशोक पप्पा देतात. मी काय करतेय, काय शिकलेय, काय शिकतेय हे सगळं त्यांना माहीत आहे. माझं प्रत्येक काम ते आवर्जून पाहतात, प्रत्येक मुलाखत ऐकतात. ते मला मुलगी मानत असले तरी ते माझे उत्तम टीकाकार आहेत. मी करायला हवं, कसं वागायला हवं तिथपासून ते काय चुकलं, कुठे काय चुकीच विधान केलं ही सगळं ते मला सांगत असतात. आमच्यातलं नातं इतकं घट्ट आहे की माझा फोन नंबर ही त्यांना पाठ आहे.’

Tags: ashok sarafInstagram PostMarathi ActorsSayali SanjeevViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group