Take a fresh look at your lifestyle.

बाबा कायम माझ्यासोबत असावे म्हणून..; सायली संजीवची भावुक करणारी पोस्ट

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या आयुष्यात अत्यंत महत्वाच्या व्यक्तींमध्ये शिस्त लावणारे पण तितकंच सांभाळून घेणारे बाबा असतात. आई नसेल तर आयुष्य फिकं वाटतं पण बाबा नसतील तर जगण्याचा आधार निखळल्यासारखं वाटत. गेल्या ३० नोव्हेंबर, २०२१ रोजी मराठी अभिनेत्री सायली संजीव ही या दुःखातून गेली आहे. कारण ३० नोव्हेंबरचा दिवस तिच्या बाबांना तिच्यापासून दूर घेऊन गेला होता. बाबांना निरोप देणं सोप्प नव्हतं कारण सायली त्यांच्या अतिशय जवळ होती. आज तिच्या बाबाना जाऊन तब्बल ६ महिने उलटले आहेत आणि आजच्या दिवशी तिने बाबांच्या आठवणीत एक पोस्ट शेअर केली आहे. जी थोडी भावनिक आणि थोडी भावणारी आहे.

अभिनेत्री सायली संजीव हि तिच्या बाबांच्या अतिशय जवळ होती. यामुळे बाबांच्या निधनानंतर ती अक्षरशः कोलमडून गेली होती. दरम्यान बाबांना जाऊन ६ महिने झाल्यानंतर तिने हि पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने तिच्या बाबांच्या नावाची अंगठी तयार करून घेतल्याचे सांगितले आहे. शिवाय तिने याच अंगठीचा फोटो शेअर केलाय आणि आपल्या भावना कॅप्शनमध्ये व्यक्त केल्या आहेत. तिने लिहिलंय कि, बाबा कायम माझ्यासोबत माझ्याजवळ असावे म्हणून त्यांनी वापरलेल्या अंगठीची मी ही अंगठी माझ्यासाठी करून घेतली. आज बरोबर ६ महिने झाले त्यांना जाऊन.. I love you बाबा..

सायलीच्या वडिलांचे नाव संजीव असून सायली आडनाव नव्हे तर बाबांचे नाव गर्वाने आजही लावते. बाबांच्या निधनावेळी सायली आतून तुटली होती पण बाबाची लेक खंबीरपणे दुःखातून सावरली. दरम्यान तिने इंस्टाग्रामवर वडिलांसोबतचे फोटो शेअर करत एक भावनिक पोस्टदेखील शेअर केली होती. यात तिने लिहिले होते की, संजीव २६/०७/१९५८ – ३०/११/२०२१. तुला माहित आहे नं बाबा माझं तुझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम होतं, आहे आणि कायम असेल.. या जगात सगळ्यात जास्त.. तू आयुष्य आहेस माझं. तिने पुढे लिहिले की, दैव होता तू, देव होता तू, खेळण्यातला माझा खेळ होता तू.. शहाणी होते मी, वेडा होता तू, माझ्या साठी कारे सारा खर्च केला तू.. आज तू फेडुदे पांग हे मला, जगण्या रे मला अजूनही तूच हवा..बाबा, थांब ना रे तू बाबा, जाऊ नको दूर.. तिची हि पोस्ट अतिशय भावनिक करणारी होती.