Take a fresh look at your lifestyle.

जय जवान, जय किसान’ म्हणत सलमानने जोडलं काळ्या मातीशी नातं

मुंबई | देशात लॉकडाउन सुरु झाल्यापासून अभिनेता सलमान खान त्याच्या कुटुंबीयांसोबत पनवेल येथील फार्महाऊसवर अडकला आहे. या काळात तो विविध कामांमध्ये त्याचं मन रमवतांना दिसत आहे. अलिकडेच त्याने सोशल मीडियावर शेतात काम करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. त्यामुळे सध्या चाहत्यांमध्ये सलमानची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.

सलमान बऱ्याच वेळा सोशल मीडियावर त्याचे काही व्हिडीओ, फोटो शेअर करत असतो. या लॉकडाउनच्या काळातदेखील तो इन्स्टाग्राम, ट्विट आणि फेसबुक यांच्या माध्यमातून त्याचे अपडेट्स चाहत्यांना देत आहे. यात त्याने शेतात काम करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. यात तो शेताच्या मधोमध उभा असून शेताची लावणी करताना दिसत आहे.

“दाने दाने पे लिखा होता हैं, खाने वाले का नाम. जय जवान, जय किसान”, असं कॅप्शन देत सलमानने हा फोटो शेअर केला आहे. दरम्यान, अलिकडेच सलमान फार्महाऊसवर पावसाचा आनंद घेत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. सलमानचा बॉडीगार्ड शेरा याने त्याच्या इन्स्टाग्रामवर तो फोटो शेअर केला होता. सलमान लवकरच राधे या आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दिशा पटानी, रणदीप हुड्डा हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.