Take a fresh look at your lifestyle.

नववीत शिकणार्‍या विद्यार्थ्याने केली अमोल कोल्हेंवर कविता

लातुर प्रतिनिधी | सध्या संपुर्ण राज्यात कोरोनामुळे लाॅकडाउन सुरु आहे. लाॅकडाउनच्या काळात नागरिकांसाठी दूरदर्शनवर महाभारत आणि रामायण या मालिका पुन्हा प्रसारित करण्यात येत आहेत. तसेच अमोल कोल्हे यांची मुख्य भुमिका असलेली राजा शिवछत्रपती आणि स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकाही पुन्ह:प्रसारित करण्यात येणार आहेत. आता लातुर जिल्ह्यातील एका नववीत शिकणार्‍या विद्यार्थ्याने अभिनेते अमोल कोल्हे यांच्यावर कविता रचली आहे.

अमोल कोल्हेंचा फॅन फाॅलोअर संपुर्ण राज्यात आहे. राजा शिवछत्रपती आणि स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकांनी कोल्हे यांन्ना घराघरात पोहोचवले आहे. लातुरच्या गणेश वलसे या विद्यार्थ्याची कविता जिक्ह्यात व्हायरल होत आहे. पहा गणेशची कविता गणेशच्याच तोंडून