Take a fresh look at your lifestyle.

मौनी रॉय झाली मिसेस नांबियार! दाक्षिणात्य पेहरावात खुलले नवरीबाईंचे रूप; पहा फोटो

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्री आणि मालिका विश्वातील अत्यंत लोकप्रिय असा ओळखीचा चेहरा असणारी अभिएन्ट्री मौनी रॉय हिचा विवाह सोहळा नुकताच पार पडला आहे. मौनी रॉयने आपल्या साताजन्माचा जोडीदार म्हणून सूरज नांबियारची निवड केली आणि त्याच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे.

तिच्या लग्नाचे लहान सहान अपडेट मिळवण्यासाठीही तिचे चाहते फार आतुर असताना आता तिच्या लग्नाच्या प्रत्येक सोहळ्यासह लग्नाचे देखील फोटो व्हायरल होत आहेत. मौनी आणि सुरजने गोव्यामध्ये मल्याळी तसेच बंगाली अश्या दोन रितीरिवाजानुसार साताजन्माची गाठ बांधली आहे. सध्या सोशल मीडियावर मौनी लग्न सोहळ्याचे खास फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.

 

मौनी मुळात बंगाली असल्यामुळे बंगाली आणि सुरज मल्याळी असल्यामुळे मल्याळी अश्या दोन पद्धतीत त्यांचे लग्न पार पडले. मुख्य म्हणेज या दोन्ही पेहरावांमध्ये मौनी अतिशय सुंदर दिसत होती. लग्नाचे तेज नवरीबाईंच्या चेहऱ्यावर अगदी खुलून आले होते. या आधी मौनी आणि सुरजच्या लग्न आधीच्या प्रत्येक विधीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले होते. यामध्ये अगदी संगीत, मेहंदी, हळद अश्या प्रत्येक विधीचा समावेश होता. मौनी आणि सूरजच्या लग्नात फक्त त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि काही खास मित्रच उपस्थित होते.

मौनी रॉयचा पती सुरज नांबियार हा एक सर्वसामान्य बॅकर आहे. माहितीनुसार, मध्यंतरी लॉकडाउनच्या काळात मौनी तिच्या बहिणीच्या घरी दुबईमध्ये राहिली होती. त्यावेळी तिची आणि सूरजची ओळख झाली.

हि ओळख आधी मैत्रीत आणि त्यानंतर हळूहळू प्रेमात परिवर्तित झाली. यानंतर दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला. मौनीच्या लग्नात नागीन फेम अर्जुन बिजलानी आपल्या कुटुंबासोबत उपस्थित होता. त्यानेही आपल्या इंस्टाग्रामवर मौनी कि शादी असा हॅशटॅग देऊन तिच्या लग्नातील फोटो शेअर केले आहेत.