Take a fresh look at your lifestyle.

शुभमंगल सावधान! रोहित- जुईलीने बांधली जन्मोजन्माची गाठ; पहा लग्नसोहळ्याचे खास क्षण

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी संगीत विश्वातील कुलेस्ट आणि बिंधास्त कपल म्हणून नेहमी चर्चेत असलेले रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर लग्न बंधनात अडकले आहेत. अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या चालू विधी खूप चर्चेत होत्या. त्याचे फोटो देखील सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. अगदी, ग्रहमख, संगीत, मेहंदी, हळद आणि साखरपुडा अश्या प्रत्येक सोहळ्याचे फोटो त्यांनी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. यानंतर आता त्यांच्या शाही लग्न सोहळ्याचे खास क्षण आपण सोशल मीडियावर पाहू शकाल. अखेर जोगळेकरांची लेक राऊतांची सून झालीच.

रोहित आणि जुईलीचा हा शाही विवाह सोहळा पुण्यातील ढेपे वाडा येथे संपन्न झाला. त्यांच्या लग्नात अनेक कलाकार सहभागी झाले होते. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर कमाल करताना दिसत आहेत. या फोटोंमध्ये रोहित आणि जुईली दोघेही अतिशय सुंदर दिसत होते. याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद, समाधान आणि सुखाची झलक दिसत होती. त्यांचा पेहराव अतिशय साधा पण सुंदर होता. बैंगनी रंगाच्या पेशवाई साडीत नवरीबाई शब्द अपुरे पडतील इतक्या सुंदर दिसत होत्या. तर नवरदेव राजबिंडा म्हणायला हरकत नाही.

मराठी कलाविश्वात रोहित आणि जुईली यांची जोडी फारच चर्चेत असायची. कारण ते नेहमीच आपलं प्रेम एकदम बिंधास्त व्यक्त करायचे. मग सोशल मीडिया असो किंवा एखादा सोहळा. रोहित आणि जुईली नेहमी एकत्र दिसायचे. त्यामुळे कुल आणि क्युट कपल म्हणून यांची ख्याती आहे. रोहित आणि जुईली कधी लग्न करणार असा प्रश्न सगळ्यांना पडला असतानाच दोघांनी लग्न करणार असल्याची बातमी दिली. मग काय चाहत्यांनी त्यांना डोक्यावर घेतले. त्यांचे लग्नाच्या प्रत्येक सोहळ्याचे फोटो प्रचंड व्हायरल झाले. यानंतर आता लग्न सोहळ्याचे फोटोदेखील सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. या सोहळ्याला अनेक सेलिब्रिटी हजर असल्याचं दिसून आलं.