Take a fresh look at your lifestyle.

मलायकाची कंबर पाहून टेरेन्सने केले ‘उफ्फ..’ इशारे; सोशल मीडियावर टीकांचा पाऊस

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि प्रसिद्ध कोरिओग्राफर टेरेन्स लुईस हे दोघेही सध्या डान्सिंग रियॅलिटी शो मध्ये परीक्षक म्हणून काम करत आहेत. या शोचे नाव ‘इंडियाज बेस्ट डान्सर २’ असे आहे. यामध्ये मलायका आणि टेरेन्स सोबत प्रसिद्ध कोरिओग्राफर गीता कपूरदेखील परीक्षक म्हणून आहेत. या तिघांचेही अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकदा ट्रेंड करत असतात. कधी हटके, कधी मजेशीर तर कधी डान्सिंग मुमेंट शेअर करून ते स्वतः देखील आनंद अनुभवतात आणि आपल्या चाहत्यांनादेखील खुश ठेवत असतात. अशातच आता मलायका आणि टेरेन्सचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पण नेटकरी यावर एकापेक्षा एक टीकांचा वर्षाव करत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Terence Lewis (@terence_here)

त्याच झालं असं कि, शोच्या सेटवर बसून कंटाळलेल्या मलायका आणि टेरेन्सने एक डान्सिंग व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणे ते दोघे मस्त मजा मस्ती करत आहेत. पण त्यांचा हा डान्स पाहून नेटकऱ्यांनी काही मजा आलेली दिसत नाही. याचे कारण म्हणजे मलायकाची कंबर पाहून टेरेन्सने जे काही इशारे केले आहेत.. उफ्फ. आता असे इशारे न जाणे कुणाकुणाला बोचले असतील. परिणामी ट्रोलिंगचा सामना. या व्हिडिओमध्ये मलायका आणि टेरेन्स नाचत आहेत. या व्हिडिओमध्ये एक म्युझिक वाजते आणि मलायका डान्स करायला सुरुवात करते. टेरेन्ससुद्धा डान्स करतो आणि अचानक पाठी बघतो तर त्याची नजर मलायकाच्या कंबरेवर पडते. यावेळी ती असे काही इशारे करतो, जे पाहून भले भले शर्मसार झाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Terence Lewis (@terence_here)

मुख्य म्हणजे हा व्हिडीओ स्वतः टेरेन्स लुईसने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यानंतर नेटकऱ्यांनी आपलं काम चोख बजावत टेरेन्स आणि मलायका दोघांनाही ट्रोलिंगच्या चक्कीत चांगलंच दळून काढलं आहे.अनेकांनी यावर फक्त त्यांच्या डान्सवर टिप्पणी केली आहे तर यातील काही असेही आहेत ज्यांनी मलायकाला खाजगी आयुष्यावरून टोमणे दिले आहेत. याशिवाय अनेक नेटकऱ्यांनी मलायका नोरा फतेहीला कॉपी करतेय. मलायका नोराच्या मुव्ह्ज करण्याचा प्रयत्न करतेय असे म्हटले आहे.