Take a fresh look at your lifestyle.

आणखी एक बाजी..! हेमांगीच्या ‘तिचं शहर होणं’ चित्रपटाची कान IFF’मध्ये निवड

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जगभरात सुरु असलेल्या विविध मुद्द्यांवर बेधडक बोलणारी मराठी अभिनेत्री हेमांगी कवी हि नेहमीच आपल्या विविध पोस्टमुळे चर्चेत असते. मग ती पोस्ट कोणतीही असो… बाई.. बुब्स आणि ब्रा किंवा मग चित्रपटांची निर्मिती. तिने आतापर्यंत साकारलेल्या अनेक भूमिका गाजल्या आहेत. त्यातील काही भूमिकांमध्ये ती कॉमिक अभिनय करताना दिसली तर काहींमध्ये मार्मिक. अशाटच तिच्या एका चित्रपटाला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होण्याची संधी मिळणे हि तिच्यासाठी मोठी बाब आहे. याबाबत तिने स्वतःच सोशल मीडियावर माहिती दिली आहे.

तिने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर पोस्ट शेअर करत हि आनंदाची आणि अभिमानाची बाब चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तिने लिहिले आहे कि, ‘अत्यंत मानाच्या अशा समजल्या जाणाऱ्या कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या ‘फिल्म मार्केट’ मध्ये आमचा चित्रपट ‘तिचं शहर होणं’ ची निवड झालेली आहे. महाराष्ट्र शासनाकडून पाठवण्यात येणाऱ्या तीन चित्रपटांपैकी तिचं शहर होणं हा एक चित्रपट आहे. ही निवड केल्याबद्दल महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. अमित देशमुख व निवड समितीतील सर्व सदस्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो.

अलीकडेच हेमांगीचे चित्रपट प्रदर्शनाबाबतची पोस्ट चांगलीच चर्चेत आली होती. यात हेमांगी म्हणाली होती कि , ‘प्रत्येक कलाकाराला वाटतं आपला सिनेमा superhit व्हावा, अगदी superhit वगैरे नाही झाला, निदान थोडा तरी चालावा. किती आनंद असतो त्यात. मला कश्याचा आनंद होतोय माहितेय? या वर्षी माझे सिनेमे किमान ‘प्रदर्शित’ तरी होतायेत याचाच. चित्रपट चालणं न चालणं खूप पुढची गोष्ट. गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘पिपाणी’ हा माझा 2012 साली प्रदर्शित झालेला शेवटचा सिनेमा! त्या नंतर मी ‘साहेब, अन्तर्दाह, पिज्जा- मुन्ने, चूक भूल द्यावी घ्यावी, वऱ्हाडी वाजंत्री, गडद जांभळ, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, स्कूल चलें, बाहुलीचं लगीन, आणखी २-३ सिनेमे ज्याची नावं आता मला आठवत ही नाही, माझी मध्यवर्ती भूमिका असलेले असे १२ ते १३ सिनेमे चित्रीकरण पूर्ण होऊन वेगवेगळ्या कारणास्तव प्रदर्शितच झाले नाहीत! प्रत्येक कलाकाराला त्याच्या आयुष्यात, कारकिर्दीत चित्रपट प्रदर्शित न झाल्याची अशी झळ बसलेली असते पण माझ्यासाठी ते १३ सिनेमे म्हणजे जरा जास्तच झळ बसलीय असं वाटतं’

पुढे, ‘यावेळी मात्र एकाच वर्षी माझे ४ सिनेमे प्रदर्शित होतायेत याचा किती आनंद होतोय काय सांगू तुम्हांला? त्यातला ‘पांडू’ जरी मी त्यात पाहुणी कलाकार असले तरी वर्षाच्या सुरवातीलाच release झाला. ६ मे ला ‘भारत माझा देश आहे’ चित्रपट येतोय, २४ जून ला तमाशा Live येतोय. ‘तिचं शहर होणं’ राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजतोय, तोही प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. आता या चित्रपटांचं काय भविष्य आहे ते वेळच ठरवेल. पण हे चित्रपट प्रदर्शित होतायेत यानेच ‘आनंद पोटात माझ्या माईना’ झालाय. खूप मस्त वाटतंय!’ अशा शब्दात तिने आपल्या भावना चाहत्यांसमोर मांडल्या आहेत.