Take a fresh look at your lifestyle.

दुःखद! जेष्ठ रंगकर्मी अभिनेते शंकर राव यांचे निधन

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कन्नड रंगभूमी आणि मनोरंजन चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते शंकर राव यांचे बंगळुरू येथे निधन झाले. त्यांनी वयाच्या ८४व्या वर्षी जगाचा निरोप घेत अखेरचा श्वास घेतला. तुमाकुरू येथील रहिवासी असणारे शंकर राव हे एक रंगकर्मी असून आपल्या कारकिर्दीची सुरुवात त्यांनी थिएटरपासूनच केली होतो. यांनी बेंगळुरूमध्ये थिएटर आर्टिस्ट म्हणून अभिनय क्षेत्रात पहिले पाऊल टाकले आणि पुढे खोलवर रुजवत गेले. त्यांनी स्वतःचे कलाक्षेत्र नावाचे नाट्यगृहदेखील स्थापन केले होते. ज्याला सुरुवातीला त्यांच्या मासिक वेतनातून आर्थिक मदत देण्यात येत होती.

जसजसे प्रेक्षक रंगभूमीकडे वळले आणि रंगभूमीची लोकप्रियता दिवसागणिक वाढत गेली. तसतसे त्यांनी यारा साक्षी हे नाटक प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सादर केले. हे नाटक ब्रिटीश लेखिका अगाथा क्रिस्टी यांच्या द व्हिटनेस फॉर द प्रोसिक्यूशन या गूढ लघुकथेवर आधारित होते. शंकर राव यांचे हे नाटक प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर उचलून घेतले. हे नाटक इतके लोकप्रिय ठरले कि अगदी रेकॉर्ड ब्रेकचं. मग काय? पुढं शंकर राव यांच्यासाठी अनेको नवनवीन संधी आणि यशाचे नवे दरवाजे उघडले.

एका चित्रपट निर्मात्याने ‘यारा साक्षी’ या कन्नड नाटकाचे वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटात रूपांतर करण्यासाठी शंकर राव आणि संबंधित त्यांच्या टीमशी संपर्क साधला. या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी रंगमंचावरून मोठ्या पडद्यावर वाटचाल केली. चित्रपट निर्माते एमआर विठ्ठल यांच्या दिग्दर्शनाखाली शंकर राव यांनी पडद्यावर अभिनयाचे धडे घेतले त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. त्यांनी अनेक चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्येदेखील अव्वल दर्जाचे काम केले. पण पापा पांडू या लोकप्रिय विनोदी मालिकेतील ‘बॉस बलराजू’ या त्यांच्या व्यक्तिरेखेला वेगळी ओळख मिळाली. यामुळे कन्नड मनोरंजन सृष्टीला या कलाकाराचे नेहमीच स्मरण राहील.