हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीला अद्भुत कलेचा अनोखा वारसा मिळाला आहे. हा वारसा ज्यांनी चालविला आणि पुढच्या पिढीला प्रदान केला त्या प्रत्येक कलाकाराची सिने इंडस्ट्रीमध्ये एक वेगळीच ओळख आहे. त्यापैकी एक म्हणजे मराठी अभिनेत्री वत्सला देशमुख. सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री रंजना देशमुख यांच्या त्या आई होत्या. वत्सला यांच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. दरम्यान मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.
*मराठी व हिंदी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री वत्सला देशमुख यांचे दुःखद निधन……*
महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली….!!!!!🙏🏽🙏🏽🙏🏽 pic.twitter.com/uaGBzR5eJ9
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) March 12, 2022
मिळालेल्या माहितीनुसार, मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री वत्सला देशमुख यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले आहे. वयाशी संबंधित आरोग्यविषयक तक्रारी आणि गुंतागुंत निर्माण झाल्याने त्यांनी १२ मार्च २०२२ रोजी अखेरचा श्वास घेतला. यात मनसे चित्रपट सेने अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विट करीत वत्सला यांना श्रद्धांजली व्हायला आहे. यात त्यांनी लिहिले आहे कि, मराठी व हिंदी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री वत्सला देशमुख यांचे दुःखद निधन.. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली….! वत्सला देशमुख त्यांची स्वतःची अशी एक छाप कायम चाहत्यांच्या मनामध्ये कायम आहे. नाग पंचमी, जल बिन मछली नृत्य बिन बिजली, माई माऊली यांसारख्या चित्रपटांचा त्या महत्वाचा भाग होत्या.
वत्सला यांनी आपल्या करिअरची सुरुवात ‘तुफान और दिया’ या हिंदी चित्रपटातून केली. त्यांचे ‘फायर’, ‘नागपंचमी’, ‘जल बिन मछली नृत्य बिन बिजली’ असे अनेक चित्रपट चांगलेच गाजले होते. पण ‘सुहाग’ या चित्रपटातून त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. त्यांनी पिंजरा आणि नवरंग या चित्रपटातसुद्धा अव्वल काम केलं होतं. आई, मावशी, काकू, आजी अशा विविध भूमिकेतून त्या आजवर प्रेक्षकांसमोर आल्या. त्यामुळे चाहत्यांनी त्यांनी प्रत्येक भूमिकेत आपलं मानलं होत.
Discussion about this post